शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील हायब्रिड कोर्सकडे विद्यार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST

पुणे : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून भारातून परदेशात येणाऱ्या आणि परदेशातून भारतात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची ...

पुणे : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून भारातून परदेशात येणाऱ्या आणि परदेशातून भारतात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तसेच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांनी सुरू केलेल्या हायब्रिड अभ्यासक्रमांकडे सुध्दा भारतीय विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भारतासह जगभरात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे परदेशातील शिक्षणाची दारे बंद झाली. परंतु, काही शैक्षणिक संस्थांनी परदेशातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने प्रवेश दिला. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून संलग्न महाविद्यालयात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा सुमारे ५५० ते ६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून लवकरच या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होणार आहे.

दिलीप ओक अ‍ॅकडमीचे संचालक दिलीप ओक म्हणाले, कोरोनाचा परदेशातील शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेतील बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी काही भाग ऑनलाईन व काही ऑफलाईन असा हायब्रिड अभ्यासक्रम तयार केला.मात्र, त्यास भारतातील केवळ १० टक्के विद्यार्थ्यांकडूनच प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ९० टक्के विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे म्हणाले, कोरोनामुळे पुणे विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत फारसा फरक झाला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.