शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगी रुग्णांत घट

By admin | Updated: November 5, 2015 02:08 IST

गेल्या पाच वर्षांतील कुष्ठरोग रुग्णांची संख्या वाढत असतानाच २०१४- १५ या वर्षी कुष्ठरोग रुग्ण आटोक्यात आणले आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात

पिंपरी : गेल्या पाच वर्षांतील कुष्ठरोग रुग्णांची संख्या वाढत असतानाच २०१४- १५ या वर्षी कुष्ठरोग रुग्ण आटोक्यात आणले आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ५१,८६५ नागरिकांपैकी ४ रुग्ण आढळले आहेत. यासाठी शासनाने राष्ट्रीय शहर आरोग्य उपक्रम ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कुष्ठरोगाबद्दल वस्त्यांमधील, झोपडपट्टीतील लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या आरोग्यसेविका जेव्हा घरोघरी जाऊन तपासणी करतात, तेव्हा लोक तपासणी करण्यास घाबरतात. स्वत:ला असलेल्या आजाराबद्दल सांगायला कचराई करतात. त्यामुळे या आरोग्यसेविकांना त्यांना विश्वासात घेऊन आरोग्यविषयक, कुष्ठरोगविषयक माहिती द्यावी लागते. प्राथमिक स्वरूपाची माहिती देऊन लोकांनी तपासणी करावी, यासाठी प्रोत्साहन दिले जाते. २०१०च्या सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाचे एकूण १०५ रुग्ण आढळून आले होते, तर २०११-१२मध्ये रुग्णांची संख्या १७८ झाली होती. २०१२-१३ साली २००, २०१३-१४ साली २५८वर वाढताना आढळते. तीच रुग्णसंख्या २०१४-१५च्या सर्वेक्षणात १४६वर आली आहे. सध्या आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये ४ रु ग्ण आढळून आले असून, १५ ते ४५ असा हा वयोगट आहे. हे रुग्ण बांधकाम विभागामध्ये काम करणारे कामगार आहेत. (प्रतिनिधी)कुष्ठरोगाबाबत आपल्या समाजात अनेक समज- गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर झाले पाहिजेत. लोकांनी समाजाचा विचार न करता कुष्ठरोगाबाबत जागृत राहिले पाहिजे. शिवाय रोग झाल्यास मुक्तपणे त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू केले पाहिजेत. शासनाच्या राष्ट्रीय शहर आरोग्य उपक्रमांतर्गत कुष्ठरोग निर्मूलनासाठी आवश्यक अशा कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे अधिकाधिक सर्वेक्षण करता येत नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. - डॉ. सुनील चिद्रावार, वैद्यकीय अधिकारीसर्वेक्षण : केंद्र शासनाचा राष्ट्रीय शहर आरोग्य उपक्रम हा सध्या पिंपरी शहरात राबविण्याचे कार्य सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे ५० आरोग्यसेवकांची नियुक्ती केलेली आहे. दररोज ५० ते ७० घरांची तपासणी केली जाते. तसेच लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रोगनिदान करावे, यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते.