शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा

By admin | Updated: May 20, 2014 23:20 IST

पुणे वन्यजीव विभागाने सहा अभयारण्यांत बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावर प्राणिगणना केली. यामध्ये नानज अभयारण्यात एक नर माळढोक पक्षी आढळून आला

भीमाशंकर : पुणे वन्यजीव विभागाने सहा अभयारण्यांत बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावर प्राणिगणना केली. यामध्ये नानज अभयारण्यात एक नर माळढोक पक्षी आढळून आला, तर भीमाशंकर अभयारण्यात बिबट्याच्या पाउलखुणा आढळून आल्या. मे महिन्यात येणार्‍या बौद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलांमध्ये पाणवठ्याच्या जागी मचान तयार करून त्यामध्ये रात्रभर बसून प्राणी गणना व निरीक्षण केले जाते. या वर्षी शेकरूसाठी प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर अभयारण्य क्र.१ व २, मोळढोकसाठी असलेल्या नानज/गंगेवाडी, काळविटांसाठी असलेल्या करमाळा, रेहेकूरी, चिंकारासाठी असलेल्या सुपे अभयारण्यात दि.१४ मे रोजी सायंकाळपासून, तर दि.१५ मे रोजी दुपारपर्यंत पाणवठ्याच्या जागी बसून ही गणना करण्यात आली. यामध्ये वनकर्मचारी व हौशी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. जंगलात असणार्‍या वन्यप्राण्यांची संख्या, प्रकार, प्रजाती यांचा अंदाज घेण्यासाठी, तसेच पाणवठ्याची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्यासाठी ही प्रगणना केली जाते. भीमाशंकर अभयारण्य क्र.१ मध्ये २२ वनकर्मचारी व २२ निसर्गप्रेमी यांच्या साहाय्यााने प्रगणना करण्यात आली. प्रगणनेच्या दिवशी सायंकाळी भीमाशंकरमध्ये पाऊस पडल्याने व रात्री दाट धुके पसरल्याने प्रगणनेत अडचणी निर्माण झाल्या. रेहेकुरी अभयारण्य क्षेत्रामध्ये १५८ काळवीट दिसून आले. त्याचप्रमाणे या क्षेत्रात लांडगे, कोल्हे व खोकडही दिसले. सुपे अभयारण्य क्षेत्रामध्ये १९३ चिंकारा दिसले. यापैकी १५ पिले व १०९ माद्या होत्या. नानज/गंगेवाडी येथे अभयारण्यातील मार्डी भागात एक नर माळढोक पक्षी दिसून आला. (वार्ताहर)