शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

‘आर सेव्हन’अंतर्गत सदनिकांचा ताबा सोडा, अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:14 IST

पुणे : महापालिकेने ‘आर ७’ अंतर्गत ताब्यात घेतलेल्या हजारो सदनिकांमध्ये काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले ...

पुणे : महापालिकेने ‘आर ७’ अंतर्गत ताब्यात घेतलेल्या हजारो सदनिकांमध्ये काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबधित नागरिकांनी येत्या सात दिवसांत सदनिका रिकाम्या कराव्यात, अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासोबतच त्या सर्व सामानासह ताब्यात घेण्यात येतील, अशी नोटीस आज महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी संबंधितांना बजावली आहे.

बांधकाम नियमावलीतील आर ७ अंतर्गत मिळणाऱ्या सदनिकांवर महापालिकेची मालकी आहे. या सदनिका प्रामुख्याने प्रकल्प विस्थापितांना भाडेत त्तवार देण्याचे प्रयोजन आहे. महापालिकेला आर ७ अंतर्गत मिळालेल्या सदनिकांमध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प विस्थापित भाडेकरू म्हणून राहात आहेत. परंतु काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. संबंंधित नागरिकांनी येत्या सात दिवसांत या सदनिका सुस्थितीत रिकाम्या कराव्यात, अन्यथा या सदनिकांमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याप्रकरणी ट्रेसपासचा गुन्हा दाखल करून, सर्व साहित्यासह सदनिका ताब्यात घेण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आल्याचे राजेंद्र मुठे यांनी सांगितले.