शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी अभिप्रायाविना

By admin | Updated: June 15, 2014 03:46 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत महापालिकेने आपली भूमिका न मांडताच शहरातील व्यापाऱ्यांची भूमिका राज्यशासनाला कळविली आहे

पुणे : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत महापालिकेने आपली भूमिका न मांडताच शहरातील व्यापाऱ्यांची भूमिका राज्यशासनाला कळविली आहे, त्यामुळे एकीकडे एलबीटीला सक्षम पर्याय द्या, अशी मागणी करणाऱ्या पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीच मौन पाळण्याची भूमिका घेतली असून एलबीटीचा चेंडू पुन्हा राज्यशासनाच्या कोर्टात टोलविला आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर पालिकेची भूमिका अद्यापही गुलदस्तातच आहे.राज्यशासनाने मागील वर्षीपासून २५ महापालिकांमध्ये एलबीटी लागू केला आहे. मात्र, या करप्रणालीस राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हा कर रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, एलबीटी रद्द केल्यास महापालिकेस आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने तसेच काही महापालिकांकडून त्यास विरोध होत असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या घेतलेल्या बैठकीत पालिकांनी व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घ्यावी. तसेच त्यावर महापालिकेने आपला अभिप्राय देऊन एलबीटीबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार, महापौर चंचला कोद्रे यांनी दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यशासनाने एलबीटी, जकात, व्हॅटवर सरचार्ज तसेच प्रवेश कर असा कोणताही कर लावू नये. या उलट पुणे शहरातून जमा होणाऱ्या व्हॅटमधील २० टक्के रक्कम पालिकेस विकासकामांसाठी द्यावी, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली, त्यामुळे पालिकेच्या स्वायत्ततेस धक्का पोहोचणार नाही, याचा विचार करून पालिका आयुक्त आणि पक्षनेत्यांशी चर्चा करून पालिकेची भूमिका राज्यशासनास कळविण्यात येणार असल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी सांगितले होते. त्यानुसार, शुक्रवारी पालिकेने राज्यशासनास व्यापाऱ्यांशी झालेला अहवाल पाठविला आहे. मात्र, त्यात फक्त व्यापाऱ्यांनी मांडलेली भूमिकाच देण्यात आली आहे, त्यामुळे हा अहवाल केवळ कागदी घोडे नाचविण्याचाच प्रकार घडला आहे. या अहवालात महापालिकेकडून कोणतीही भूमिका न मांडल्याने पालिकेस एलबीटी रद्द केला तर कोणता कर हवा आहे, याबाबत पालिकेचीच भूमिका गुलदस्तात राहिली आहे.(प्रतिनिधी)