शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाने सजली दिवाळीची सायंकाळ

By admin | Updated: November 12, 2015 02:38 IST

दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ

पुणे : दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ आणि जेवणाचा आनंद लुटून सायंकाळी पूजेसाठी घरातील सर्व मंडळी एकत्रित जमल्याचे चित्र घरोघरी पाहायला मिळाले. वर्षभर मिळालेल्या संपत्तीची पूजा करून हा दिवस साजरा केला जातो. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेऊन, तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी हे स्वच्छतेचे प्रतीक मानले जात असल्याने अशाप्रकारे केरसुणीची पूजा करण्यात येते. त्यापद्धतीने घरोघरी अशी पूजा करण्यात आली.घरातील सोने, नवीन वस्तू, हिशेबाच्या वह्या, बँकेची महत्त्वाची कागदपत्रे यांची मनोभावे पूजा केली जाते. येणाऱ्या वर्षात लक्ष्मीची आपल्यावर अशीच कृपा राहू दे, यासाठी प्रार्थना करण्याची पद्धत आहे. त्यानुसार नागरिकांनी देवाकडे येणारे वर्ष भरभराटीचे जाऊ दे, अशी प्रार्थना केली. या वेळी चांदीची व सोन्याची लक्ष्मी असलेली नाणी पूजली जातात. त्यांना धने व गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. लाह्या या समृद्धीचे प्रतीक मानल्या जात असल्याने लाह्या आणि बत्तासे यांचाही नैवेद्य दाखविण्यात येतो. त्याप्रमाणे साग्रसंगीत पूजा घरोघरी करण्यात आल्याचे चित्र होते. सोसायटीतील सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी-कुंकू लावून हा प्रसाद दिला जातो. शहरातही फ्लॅटसंस्कृतीचे प्रमाण वाढले असले, तरीही अशाप्रकारे महिला एकमेकींकडे जाऊन सण साजरा करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दिवशी दारात रांगोळी काढून पणत्यांनी परिसर उजळून टाकण्यात आला होता. आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशात जीवनातील अंधकार दूर होऊन जीवन प्रकाशमान व्हावे, अशी यामागील मुख्य धारणा असते. आश्विन शुद्ध अमावस्या म्हणजेच ‘लक्ष्मीपूजन’ हा दिवस त्याला अपवाद असून, तो चांगला मानला जातो. सर्व अघटित घटना मागे सारून नव्याने जीवनाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने या दिवसाकडे पाहिले जाते. एरवी सायंकाळच्या वेळी केर काढत नाहीत; मात्र या दिवशी पूजा केलेल्या केरसुणीने सायंकाळी केर काढून घरातील अनिष्ट गोष्टी घराबाहेर घालवायच्या, अशीही धारणा रुढ आहे.