शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कायदा सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलीवर बलात्कार होतो, ही घटना अतिशय गंभीर आहे. राज्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलीवर बलात्कार होतो, ही घटना अतिशय गंभीर आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे द्योतक असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

विमाननगर परिसरातील एका पाच वर्षांच्या मुलीवर रविवारी दुपारी एका सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली. या आंदोलनानंतर मुळीक पत्रकारांशी बोलत होते.

महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘केवळ सत्तेच्या हव्यासापोटी जनमताचा अनादर करीत स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात अजिबात स्वारस्य नाही. ही परिस्थिती बदलली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जनआंदोलन केले जाईल.’

राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात. कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात. पण, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नसल्याची टीका या वेळी मुळीक यांनी केली.

---

फोटो मेल केला आहे