शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानवाच्या हस्तक्षेपामुळे भूस्खलन

By admin | Updated: July 31, 2014 02:36 IST

महाराष्ट्रातील डोंगर हे बेसॉल्ट खडकापासून तयार झाले असून संततधार पडणा-या पावसामुळे या खडकाची झीज होते. त्यामुळे डोंगराच्या उतारावर मातीचे थर जमा होतात

पुणे : महाराष्ट्रातील डोंगर हे बेसॉल्ट खडकापासून तयार झाले असून संततधार पडणा-या पावसामुळे या खडकाची झीज होते. त्यामुळे डोंगराच्या उतारावर मातीचे थर जमा होतात. परंतु, पावसाचे पाणी या मातीच्या थरांच्या वरून न वाहता त्यांच्या खालून झिरपून वाहते. त्यातच डोंगरपायथ्याचे खोदकाम केलेले असेल तर हे मातीचे थर अचानकपणे ढासळतात. आंबेगावमधील माळीण या गावाला लागून असलेल्या डोंगरावर अशाच प्रकारच्या मातीचे थर होते. जोरदार पावसामुळे हे मातीचे थर अचानकपणे ढासळल्याने दूर्दैवी घटना घडल्याची शक्यता पुणे विद्यापीठातील भूशास्त्र विभाग प्रमुखांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या घटनांचा व त्याला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा अभ्यास पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी केलेला आहे. भूशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. जे. सांगोडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. के. गायकवाड तसेच प्राध्यापक डॉ. डी. सी. मेश्राम म्हणाले, महाराष्ट्रातील डोंगर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बेसॉल्ट या खडकापासून तयार झाले आहेत. या खडकाची वारंवार पडणा-या पावसामुळे झीज होते. या खडकामध्ये फेरोमॅग्नेशियम मिनरल हा घटक असतो. या घटकाची झीज होऊन स्मिकटाईट क्लेज म्हणजेच माती तयार होतात. या मातीचे थर डोंगर उतारावरील खडकांना चिटकलेले असतात. त्याच प्रमाणे स्मिकटाईट क्ले या मातीमध्ये अधिकाधिक पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. पावसाचे पाणी शोषून घेतल्यानंतर या मातीच्या थराचे वजन त्याच्या मुळ वजनाच्या दहापट वाढू शकते. त्यात पावसाचे पाणी या मातीच्या थरावरून वाहत नाही तर थराच्या खालून वाहते. परिणामी पाणी शोषून जड झालेल्या या मातीच्या थरांची ढासळण्याची प्रकिया सुरू होते. ब-याचदा हे थर अचानकपणे काही सेकंदांमध्ये ढासळतात. परिणामी या थरांच्या खाली येणारे सर्व काही गाडले जाते. डॉ. सांगोडे म्हणाले, निसर्ग निर्मित डोंगराचे स्तर विकास कामांसाठी पोखरले जातात. डोंगराच्या पायथ्याजवळील स्थर पोखरले गेल्यास डोंगर उतारावर तयार झालेले मातीचे थर ढासळण्याच्या घटना अधिक घडतात. वर्षानुवर्षे डोंगरावर पडणा-या पावसामुळे खडकाची झीज होण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. परंतु, खडकाची झीज होऊन तयार झालेल्या मातीच्या थरांची ढासळण्याची प्रक्रिया डोगर उतारावर झाडे लावून थांबविता येऊ शकते. (प्रतिनिधी)