शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुक्यावर लँडमाफियांचा डोळा

By admin | Updated: May 18, 2014 23:56 IST

भोर तालुक्यातील १० वर्षांपूर्वीचा जमिनीचा भाव आणि आताचा असणारा जमिनीचा भाव यांमध्ये जमीन-असमानचे अंतर पडले आहे.

कापूरव्होळ : भोर तालुक्यातील १० वर्षांपूर्वीचा जमिनीचा भाव आणि आताचा असणारा जमिनीचा भाव यांमध्ये जमीन-असमानचे अंतर पडले आहे. वतनी किंवा पुनर्वसन जमिनीचा शोध घेऊन होणारे खरेदी-विक्री व्यवहार दलाल आणि अधिकार्‍यांसाठी ‘चरण्याचे कुरण’ ठरत असल्याने भोर तालुक्यातील जमिनीचा सोन्यापेक्षाही जास्त भाव खात आहे. गेल्या काही वर्षांत नीरा देवघर व चाफेट धरण कालव्यांचे विकासकरण, सहापदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग, पर्यटनस्थळ घोषित, औद्योगिक प्रकल्पाच्या वावड्या या इत्यादी कारणांमुळे येथे वेगाचा विस्तार विकास होईल. याचा परिणाम केवळ जमिनीचे भाव वाढण्यावरच नव्हे, तर अर्थकारण, राजकारणावर झाला आहे. परिणामी, खरेदी- विक्रीच्या माध्यमातून आर्थिक मलिदा लाटण्याकडे कल दिसत आहे. सध्या भोर तालुक्यात बनावट कागदपत्रांच्या साह्याने जमीन खरेदी-विक्री करणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे. वेल्हे तालुक्यात तर काही ठिकाणी एक जमीन ३ ते ४ जणांनी खरेदी केलेली सर्च रिपोर्टमध्ये दिसून आली. काही ठिकाणी भोर तालुक्यात बोगस बनावट कागदपत्रांच्या साह्याने जमीन खरेदी-विक्री होतच आहे. कापूरव्होळ, पेंजळवाडी, वेळवंड खोरे व वीसगाव खोर्‍यात अशा ठिकाणी बोगस खरेदी खते दिसून येत आहेत. भोरमध्ये १०० एकरांपेक्षा जास्त जमिनी एका व्यक्तीच्या नावावर खरेदी केल्याचे दिसून येत आहे. अशा खरेदीदारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या व्यवहारामध्ये पुणे-मुंबई तसेच इतरही अनेक शहरांमधून लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करत अल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मोठे अधिकारी, उद्योगपतीही याठिकाणी जमिनी खरेदीसाठी मोठे व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)