शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बाणेरमधील जागेचा वाद पुन्हा उफाळला

By admin | Updated: August 21, 2016 06:32 IST

बाणेर येथील माजी सैनिकांच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेने हटविल्यानंतर पुन्हा तेथे बेकायदेशीरपणे भिंत बांधल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक सनी निम्हण

पुणे : बाणेर येथील माजी सैनिकांच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेने हटविल्यानंतर पुन्हा तेथे बेकायदेशीरपणे भिंत बांधल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक सनी निम्हण आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शनिवारी रात्री चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ या घटनेनंतर निम्हण आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता़ पोलिसांनी सांगितल्यानंतरही मारामारी केल्याने पोलिसांनी सनी निम्हण आणि सचिन डोंगरे यांना रात्री उशिरा अटक केली आहे़ या घटनेनंतर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ बाणेर येथील जमिनीबाबत माजी सैनिक डोंगरे आणि तत्कालिन आमदार विनायक निम्हण यांच्यात अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे़ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत हा वाद गेला होता़ सर्व्हे क्रमांक ३९/५ ही जागा माजी सैनिकांच्या मालकीची आहे़ या जागेवर बेकायदेशीररीत्या भिंत बांधण्यात आली होती़ महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही भिंत पाडण्याचे आदेश दिले होते़ शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात ही भिंत पाडण्यात आली़ त्यानंतर सनी निम्हण व त्यांचे सहकारी तेथे आले़ त्यांनी पुन्हा तेथे भिंत बांधली़ त्या वेळी माजी सैनिकाचे नातू असलेले सचिन डोंगरे तेथे आले़ निम्हण यांनी डोंगरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली़ तसेच नागरिकांशी वादावादी केली, असे फिर्यादित नमूद केले आहे़ पोलिसांनी सर्वांना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले़ त्यानंतर निम्हण व डोंगरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमले़ त्याबरोबर पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली़ पोलिसांनी सांगितल्यानंतरही दोघांनी मारामारी केल्याने तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्याने सनी निम्हण आणि सचिन डोंगरे यांना सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त डॉ़ तेली यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)शिवसेना पक्षप्रमुखांकडे मागणार दादशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी पुण्यात येत असून, कुमार सप्तर्षी यांच्या गौरव समारंभास ते उपस्थित राहणार आहेत़ बाणेर भागात घडलेल्या प्रकारामुळे निम्हण यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी सर्व नागरिक रविवारी ठाकरे यांची भेट घेणार आहेत़