शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरच्या फायद्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव

By admin | Updated: June 10, 2016 00:58 IST

पालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ‘पर्चेस नोटीस’ स्वीकारल्याचा आरोप गुरुवारी मुख्यसभेत नगरसेवकांनी केला.

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागेचे भूसंपादन टीडीआर किंवा एफएसआयच्या माध्यमातून होऊ शकत असताना, पालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ‘पर्चेस नोटीस’ स्वीकारल्याचा आरोप गुरुवारी मुख्यसभेत नगरसेवकांनी केला. प्रशासनाकडून पालिकेचे आर्थिक नुकसान होणारा प्रस्ताव कसा स्वीकारण्यात आला?महापालिकेच्या वतीने कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी काही जागा पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत, तर काही जागांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत सर्व्हे क्रमांक ५७ च्या जागेच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. ही जागा खरेदी करण्यासाठी १२ कोटी रुपये जागा मालकाला देण्याच्या ‘पर्चेस नोटीस’चा प्रस्ताव मुख्यसभेसमोर मांडण्यात आला होता. नगरसेविका संगीता ठोसर यांनी हा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती सभागृहाला केली. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी या प्रस्तावाला आक्षेप घेतला. कोंढवा-कात्रज रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे टीडीआर किंवा एफएसआयचे पर्याय प्रशासनासमोर उपलब्ध आहेत. तरीही ती जागा खरेदी करण्याची पर्चेस नोटीस प्रशासनाने देणे नियमांना धरून नाही. डीपी रस्ता मंजूर केल्यानंतर १० वर्षांपर्यंत पर्चेस नोटीस देता येत नाही. या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी आहेत.केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. कात्रज-कोंढवा रस्ता हा प्रादेशिक विकास आराखड्याचा भाग असून, तो १९९८ ाध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ही पर्चेस नोटीस स्वीकारण्यात आल्याचे स्पष्टीकरण शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी केले. प्रशासनाच्या या उत्तराने सभासदांचे समाधान न झाल्याने हा विषय महिनाभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.