शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

लाेकांमध्ये प्रतिकारशक्ती आहे, प्रत्येकाला लसीची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST

पुणे : मागील दहा महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असण्याची ...

पुणे : मागील दहा महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक लोकांमध्ये पूर्वीचीच प्रतिकारशक्ती आहे. लहान मुलांना धोका कमी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकालाच लस घ्यावी लागणार नाही. मात्र, भविष्यात रुग्ण किती आढळतात आणि सिरो सर्व्हेमध्ये किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर येते, यानुसार लसीकरणाचे नियोजन करावे लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

फायझर कंपनीच्या माजी उपाध्यक्षांनी कोरोनाची साथ ओसरत असल्याचे सांगून आता लशींची गरज नसल्याचा दावा केला आहे. तसेच ‘आयसीएमआर’नेही देशातील प्रत्येकाला लस लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याविषयी जनआरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके म्हणाले, लस कधी येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तोपर्यंत अनेक लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. काही अभ्यास व तज्ज्ञांच्या मतानुसार ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल. देशात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व त्यानंतर ज्येष्ठ नागरीक, अन्य आजार असलेला असा क्रम ठरलेला आहे. इतरांपर्यंत लस पोहचेपर्यंत आपण हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल केलेली असेल. त्यामुळे १०० टक्के लोकांना लस द्यावी लागणार नाही. लस किती लोकसंख्येला द्यायची हे त्यावेळी होणारे सिरो सर्व्हे व रुग्णसंख्येनुसार नियोजन करावे लागेल, असे फडके यांनी स्पष्ट केले.

-----------

लसीची गरज हा वादाचा मुद्दा

आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनीही लस येईपर्यंत अनेकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल, असे सांगितले. लसीची गरज हा वैज्ञानिकांमधील वादाचा मुद्दा आहे. सध्या किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती आहे, हे नक्की माहिती नाही. पण सध्या विविध अभ्यासानुसार ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाला लस घ्यावी लागणार नाही, असे आवटे यांनीही नमूद केले.

-----------