पुणो : महापालिकेच्या सुमारे 3क्क्हून अधिक शाळांमध्ये शिक्षण घेणारी सुमारे लाखभर मुले शहरात पाणी बचतीबाबत जनजागृती करणार आहेत. पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांमध्ये अवघा दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा उरल्याने नागारिकांची जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मुलांच्या माध्यमातून किमान त्यांच्या घरांर्पयत, तसेच त्यांच्या परिसरात पाणीबचतीचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.
राज्यात मॉन्सून दाखल झालेला असला, तरी जून महिना संपण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाही, अद्याप पावसाने जोर पकडलेला नाही. त्यामुळे राज्यभरासह पुणो शहरावरही पाणी कपातीचे संकट ओढावलेले आहे. शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रणालीत अवघा दीड महिनाच पुरेल एवढा पाणीसाठा उरला असून, महापालिकेने शहरात नुकतीच 12 टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे पुणोकरांना दररोज एक वेळच पाणी देण्यात येत आहे. मात्र, हे पाणी नागरिकांनी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरू नये यासाठी शिक्षण मंडळाकडून जनजागृती करून पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.
शिक्षण मंडळाच्या शाळांमधील बहुतांश मुले झोपडपट्टी परिसरातील असल्याने त्या ठिकाणाच्या नागरिकांर्पयत पोहोचण्यासाठी या मुलांची मदत घेण्यात येणार आहे. त्या अंतर्गत या मुलांच्या माध्यमातून आपल्या घरासह परिसरातील काही घरांमध्ये पाणी काटकसरीने वापरण्याची माहिती देणारी पत्रके वाटण्यात येणार, तसेच ही मुले या घरांमध्ये जाऊन पाणी जपून
वापरावी यासाठीही जनजागृती
करणार असल्याचे दौंडकर यांनी
स्पष्ट केले.
याबाबतच्या सूचना सर्व शाळा प्रमुखांना देण्यात येणार असून,
येत्या सोमवारपासून या मोहिमेची अंमलबजावणी सुरू करण्यात
येणार असल्याचेही ते म्हणाले.
याशिवाय पालक सभांमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाईल.(प्रतिनिधी)
शाळांमधील नळांचीही दुरुस्ती होणार
च्शहरात महापालिकेच्या सुमारे 3क्क् शाळा असून, या शाळांमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्यासाठीची नळकोंडाळी आहेत. ही नळकोंडाळीही दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात येणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.
च्ज्या शाळांमधील स्वच्छतागृहांमधील नळकोंडाळी गळकी असतील, ती बदलण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत. तसेच, शाळांनी पिण्याचे पाणी इतर वापरासाठी वाया घालवू नये, याचीही दक्षता घेण्यात येणार आहे.