शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

गलांडवाडीत पपई पिकामुळे लखपती

By admin | Updated: October 14, 2016 05:16 IST

तीस गुंठे क्षेत्रात पपईचे पीक घेऊन सात महिन्यांत अडीच लाखांची कमाई करण्याची किमया इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १ गावाचे युवा शेतकरी तात्या गाडेकर

शैलेश काटे / इंदापूरतीस गुंठे क्षेत्रात पपईचे पीक घेऊन सात महिन्यांत अडीच लाखांची कमाई करण्याची किमया इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १ गावाचे युवा शेतकरी तात्या गाडेकर यांनी केली आहे.गलांडवाडी नं. १ हे उजनी पाणलोट क्षेत्रातील एक गाव. पाणलोट क्षेत्रातील शेती म्हटले, की हजारो एकरभर पसरलेला ऊसच आठवतो. मात्र, जादा पाणीवापरामुळे जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. जमिनीचे संवर्धन व्हावे. तिचा पोत टिकून राहावा. कमी खर्चात वेगळी उत्पादने घेता यावीत अशा पद्धतीचे शेतीतंत्र स्वीकारलेल्या आणि कृषीविषयक स्वच्छ व निकोप दृष्टी असणाऱ्या युवा पिढीतील शेतकऱ्यांपैकी गाडेकर हे एक शेतकरी.शेती विकसित करण्यासाठी तीन-चार वर्षांपूर्वी गाडेकर यांनी सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावरील पाणलोट क्षेत्रामधून जलवाहिनीद्वारे शेतात पाणी आणले. या हंगामात ३० गुंठे क्षेत्रात तैवान ७८६ जातीच्या पपईची ७२० रोपांची १२ बाय ६ एवढ्या अंतरावर मल्चिंग पेपरचा वापर करून लागवड केली. ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली. प्रत्येक रोपाला चांगले पाणी दिले जाईल अशा पद्धतीने ड्रिप अंथरली. त्यामुळे या पिकाला पाणीही कमी लागले. झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या गरजेप्रमाणे औषधफवारणी केली. फलधारणेसाठी विद्राव्य खतांची मात्रा, बुरशीनाशके कीटकनाशकाचा वापरही योग्य प्रमाणात केला. पपईसह डाळिंब, ढोबळी मिरची व गरजेपुरती भाजीपाल्याची ही पिके त्यांनी घेतली.