शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शेतातले मजूर निघाले प्रचाराला

By admin | Updated: February 15, 2017 01:56 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने मजुरांना अच्छे दिन आले असून ते मजुरीला टाळून विविध पक्षांच्या प्रचारात

पेठ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने मजुरांना अच्छे दिन आले असून ते मजुरीला टाळून विविध पक्षांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. जिल्हात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागात सुगीचे दिवस सुरू असून गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके काढणीला आलेली आहेत. मात्र मजुरी करून मिळणाऱ्या पैशांपेक्षा निवडणुकीत प्रचार करून जास्त पैसे मिळत असल्याने मजुरांनी लगेच मजुरीचे दर वाढवले. मजुरांचे अव्वाच्या सव्वा भाव वाढल्याने शेतकरी मात्र हतबल झाला आहे. शेतात काम करण्यासाठी मजुरांना १५० ते २०० रुपये शेतकऱ्यांकडून मिळतात. परंतु या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत या मजुरांचा भाव ३०० ते ५०० रुपये असा झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. दिवसभर उन्हातान्हात शेतात काम करायचे व १५० ते २०० रुपये घ्यायचे. मात्र या निवडणुकीत मजुरांचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. कुठल्याही पक्षाच्या प्रचारासाठी रोख स्वरूपात ३०० ते ५०० रुपये रोजंदारी दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.सलगच्या दोन-तीन वर्षांच्या दुष्काळात शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे. यंदा पिकेही चांगली आली आहेत. काही ठिकाणी पिकांची काढणीदेखील सुरू झाली आहे. परंतु पुरेसे मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. (वार्ताहर)