शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नेते बगाराम तुळपुळे यांचे निधन

By admin | Updated: April 16, 2015 00:57 IST

स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ समाजवादी, कामगार नेते बगाराम तुळपुळे यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

पुणे : स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ समाजवादी, कामगार नेते बगाराम तुळपुळे यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी प्रभा तुळपुळे, मुलगा हिमांशू आणि मुलगी इंदवी तुळपुळे असा परिवार आहे.तुळपुळे यांच्यावर मंगळवारी रात्री कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. तुळपुळे हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ‘चले जाव’ आंदोलनापासून अलीकडच्या काळातील सर्वच आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होते. वीज कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, सभा, मोर्चे काढत असतानाच त्यांनी कामगारांना प्रशिक्षण देण्याचे काम केले. कामगार चळवळीमध्ये बुद्धिवंत, क्रियाशील कामगार नेते अशी त्यांची ओळख होती. समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवून तो विचार समाजात पोहोचविण्यासाठी तुळपुळे यांनी काम केले. जागतिकीकरण आणि जमातवादाला प्रखर विरोध करत असतानाच व्यापक समाजपरिवर्तनाचे त्यांनी स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सोशालिस्ट पाटीर्चे ते मार्गदर्शक होते. वीज कामगार आणि त्यांची युनियन करून प्रश्न सोडविण्याचे त्यांनी काम केले. बुद्धिवंत कामगार नेता म्हणून ते कामगार चळवळीत ओळखले जात असत. (प्रतिनिधी)तुळपुळे यांच्या निधनामुळे कामगार चळवळीची मोठी हानी झाली आहे. इंजिनिअरिंग व्यवसायातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुळपुळे यांनी काम केले आहे. - भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी नेते कामगारांचे प्रश्न सोडवत असतानाच कामगारांना प्रशिक्षण आणि वैचारिक मार्गदर्शन करण्याचे काम तुळपुळे यांनी केले. कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या आजच्या पिढीला त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम केले.- डॉ. बाबा आढाव, कामगार नेते समाजवादी विचारांमध्ये कालसुसंगत बदल करण्याची क्षमता तुळपुळे यांच्यामध्ये होती. त्यांना कार्यकर्त्यांबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि जनतेशी संवाद असल्यामुळे त्यांच्यामध्ये ताजेपणा असायचा. त्यांच्या निधनामुळे समाजवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे.-प्रा. सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते