शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कामगार भविष्य निर्वाह निधीचा अपहार

By admin | Updated: June 19, 2014 05:25 IST

येथील औद्योगिक वसाहतीमधील लावा ब्राईट बार्स प्रा. लि. या कंपनीवर कामागरांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नाही,

जेजुरी : येथील औद्योगिक वसाहतीमधील लावा ब्राईट बार्स प्रा. लि. या कंपनीवर कामागरांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नाही, तशी तरतूदही केली नसल्याने निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (न्यास) श्रम मंत्रालय पुणे विभागाच्या वतीने जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी फिर्याद या विभागाचे निरीक्षक विजय एकनाथ सातपुते यांनी दिली आहे. याबाबत श्रम मंत्रालय पुणे विभागाचे निरीक्षक विजय सातपुते यांच्याकडून मिळालेली माहिती अशी, की लावा ब्राईट बार्स या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या भविष्याची तरतूद म्हणून (एम्लॉय प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन) केंद्र शासनांतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी न्यास (श्रम मंत्रालयाच्या अधीन) कार्यरत आहे. कंपनीने अथवा किमान २० कामगार ठेवणाऱ्या व्यवस्थापनाने दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत कामगार वेतनातून १२ टक्के रक्कम कपात करून तेवढीच रक्कम न्यासाकडे भरावयाची असते. या कंपनीने १ डिसेंबर २०११ पासून न्यासाकडे ही रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ केली. सुरुवातीला फक्त १४ कामगारांचे पैसे कंपनीकडून भरण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपनीकडून कामगारांच्या वेतनातूनही कपात केली नाही. यातून कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची व भविष्य निधी संघटनेची फसवणूक करण्याचाच उद्देश स्पष्ट होत असल्याने एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत सुमारे १ लाख १३ हजार ३७० रुपयांचा अपहार केला असल्याचा ठपका ठेवून कंपनीचे संचालक जवाहरलाल सुजमल डागा (रा. औंध, पुणे) यांच्यावर भादंवि कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त वैशाली दयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सातपुते यांनी ही कारवाई केली आहे. कामगार भविष्य निर्वाह निधीची व त्याच्या तरतुदीची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या बंद आहेत. त्यामुळे माहिती संकलनात अडचणी येत आहेत, असेही निरीक्षक सातपुते यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)