शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीची कुरुळी टॅपिंग पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या भामा - आसखेड जलवाहिनी योजनेच्या कुरुळी येथील जॅकवेलमधून टॅपिंग करून आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्यात ...

शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या भामा - आसखेड जलवाहिनी योजनेच्या कुरुळी येथील जॅकवेलमधून टॅपिंग करून आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटींची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. सध्या शेवटच्या टप्प्यातील चिंबळी (ता. खेड) भागात काम सुरू आहे. सोमवारी (दि. ३१) पालिकेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, मुख्याधिकारी अंकुश जाधव, पाणीपुरवठा विभागप्रमुख अक्षयकुमार शिरगिरे आदींनी कामाची पाहणी केली. याप्रसंगी रवी वावरे, मयूर गोरे, रोहन देशमुख आदी उपस्थित होते.

दरम्यान, सदरची योजना मार्गी लावण्यासाठी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया अथक मेहनत घेत आहेत. अनेक ठिकाणी आलेल्या अडथळ्यांवर त्यांनी स्वतः मार्ग काढत यशस्वी शिष्टाई केली. काही ठिकाणी स्थानिकांना विश्वासात घेऊन आळंदीकर यांची पाण्याची गरज निदर्शनास आणून दिली. चिंबळी, केळगाव येथील विरोधाचा सामना करत त्यावर तोडगा काढला आहे. पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची धडपड पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.

मागील अनेक दिवसांपासून तीर्थक्षेत्र आळंदीला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. स्थानिक नागरिकांना गटारगंगा झालेल्या इंद्रायणीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. परिणामी, आळंदीतील स्थानिक नागरिक विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. मात्र, होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना यशस्वी सुरू झाल्यानंतर आळंदीतील पाण्याचा वनवास संपला जाईल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

०२ आळंदी

आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कुरुळी टॅपिंग योजनेच्या खोदकामाची पाहणी करताना आळंदी नगरपरिषदेचे पदाधिकारी. (छाया : भानुदास पऱ्हाड)