याप्रसंगी ऊस शास्त्रज्ञ संशोधन केंद्र पाडेगाव डॉ. थोरवे यांनी ऊस उत्पादकता वाढीबाबत संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांचे हस्ते कै. वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कृषी दिन व कृषी संजीवनी कार्यक्रम वृक्षारोपण लावून करण्यात आला.
तसेच कृषिदूत दिव्या ढवाण पाटील यांनी देखील पीक व ऊससंवर्धनविषयी माहिती दिली. कै. आप्पाजी द्वारकोजी मदने यांच्या स्मरणार्थ फलोत्पादन संघ पिंपळीचे संचालक उत्तम मदने यांच्यावतीने पिंपळी-लिमटेक गावात सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध बक्षिसे जाहीर करण्यात आली. प्रथम क्रमांक एकतीस हजार, द्वितीय क्रमांक एकवीस हजार व तृतीय क्रमांक आकरा हजार रुपये असे या बक्षिसांचे स्वरूप आहे. तसेच विविध विकास सोसायटीचे संचालक अशोक देवकाते यांचे वतीने उत्तेजनार्थ व सहभागी शेतकरी यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
या वेळी कृषी मंडळ अधिकारी बारामती मासाळ, कृषिपर्यवेक्षक कुंभार, गोलांडे, सर्व कृषिसहाय्यक, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर, ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात, आबासाहेब देवकाते, उमेश पिसाळ, सदस्या स्वाती ढवाण, अश्विनी बनसोडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, तलाठी तेजस्वी मोरे, श्रीराम सोसायटीचे चेअरमन रमेशराव ढवाण, शेतकरी हरिभाऊ केसकर, रमेश देवकाते, महेश चौधरी, प्रदीप यादव, आनंदराव देवकाते, अमोल देवकाते, नितीन देवकाते, जयवंत केसकर, उत्तम ठेंगल, राजेंद्र चौधरी, दत्तात्रय तांबे आदी उपस्थित होते.
पिंपळीत वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम.
०५०७२०२१-बारामती-०४