शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कोंढापुरी तलाव कोरडा

By admin | Updated: May 31, 2016 02:06 IST

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.खेड तालुक्यातील थिगळस्थळ येथे चासकमानच्या डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने चालू महिन्याच्या सुरुवातीला सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनाचे लाखो लिटर पाणी ऐन दुष्काळी परिस्थितीत वाया गेल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणीही पाचुंदकर यांनी केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकरी होरपळत असताना असे बेजबाबदार कृत्य करणाऱ्यांना चांगला धडा शिकविणे गरजेचे असल्याचेही पाचुंदकर यांनी म्हटले आहे. रांजणगाव गणपतीसह परिसरातील ७ ते ८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोंढापुरी तलावावर अवलंबून आहे. या तळ्यातील पाणीसाठा शेवटच्या घटका मोजत असल्याने चासकमानचे पाणी तलावात सोडण्याची मागणी यापूर्वीच केलेली होती. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अत्यल्प दाब आणि चासकमानच्या अधिकाऱ्यांसह शासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज रांजणगावसह परिसरातील ६ ते ७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा खोडसाळ प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणी पाचुंदकर यांनी केली होती. परंतु, प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने आज रांजणगावकरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रांजणगावची स्थायी व अस्थायी मिळून मोठी लोकस्ांख्या असून पाणीप्रश्न बिकट बनला आहे. , दिवसाआड नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात आहे.त्यामुळे परिसरातील गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.(वार्ताहर)