शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रासपच्या तालुकाध्यक्षांची केली हकालपट्टी

By admin | Updated: February 13, 2017 01:28 IST

सतत पक्षविरोधी भूमिका घेऊन पक्ष, पक्षाध्यक्षांच्या प्रतिमेला हानी पोहोचविल्याचा ठपका ठेवून रासपचे तालुकाध्यक्ष माणिक काळे

बारामती : सतत पक्षविरोधी भूमिका घेऊन पक्ष, पक्षाध्यक्षांच्या प्रतिमेला हानी पोहोचविल्याचा ठपका ठेवून रासपचे तालुकाध्यक्ष माणिक काळे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. वडगाव निंबाळकर-मोरगाव जिल्हा परिषद गटातील काळे यांच्या उमेदवारीला रासपचे कार्यकर्ते ठामपणे विरोध करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिली.शनिवारी (दि. ११) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या वेळी बारामतीसह इंदापूर, पुरंदर आदी तालुक्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील वडगाव निंबाळकर, मोरगाव गटातील पक्षाचे उमेदवार व तालुकाध्यक्ष माणिक काळे यांनी ऐनवेळी पक्ष बदलला. तसेच अन्य पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली. यासाठी महायुतीमध्ये मोठ्या भावाची भूमिका असलेल्या पक्षाने विश्वासघात केल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तालुकाध्यक्ष काळे यांनी रासपचा वापर केवळ स्वत:पुरता केला. पक्षसंघटन वाढू दिले नाही. कधी राष्ट्रवादी, तर कधी अन्य पक्षांबरोबर साटेलोटे करुन पक्ष आणि पक्षाध्यक्षांच्या प्रतिमेला हानी पोहोचविण्याचे काम केले. वेळोवेळी त्यांची ही भूमिका स्पष्ट झाली आहे. त्यांच्या या पक्षविरोधी कारवायांची आजच्या बैठकीत नोंद घेऊन काळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर महायुती करायची, मात्र प्रत्यक्षात छोट्या मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण ठेवायचे. याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली, अशी माहिती दांगडे पाटील यांनी दिली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, प्रदेश सरचिटणीस प्रा. अण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, संदीप चोपडे आदी उपस्थित होते.