शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर गुरुवारी बारामतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST

सोमय्या यांच्या तिन्ही नेते गुरुवारी बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. सोमय्या यांच्या ...

सोमय्या यांच्या तिन्ही नेते गुरुवारी बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. सोमय्या यांच्या बारामती भेटीचे कारण वेगळे आहे. त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना लक्ष्य केलेले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे काही दिवसांपूर्वी भेट दिली आहे. सांगली येथे सोमय्या यांनी काही सेल्फीही काढलेले होते. आता सांगलीपाठोपाठ याच पार्श्वभूमीवर सोमय्या बारामती भेटीला येत आहेत. प्रादेशिक परीवहन अधिकारी खरमाटे यांच्या काही मालमत्तांची खरेदीचे बारामती तालुका ‘कनेक्शन’ असल्याची माहिती सोमय्या यांच्यापर्यंत पोहोचली आहे. बारामतीचे भाजपचे पदाधिकारी खरमाटे ‘कनेक्शन’च्या पार्श्वभूमीवर आवश्यक माहिती जमा करीत आहेत. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी नगरपरिषदेत देखील जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठीच सोमय्या यांनी बारामतीकडे मोर्चा वळवला आहे. सोमय्या यांची बारामतीला ही दुसरी भेट आहे. खरमाटे यांच्या मालमत्तासंदर्भात गुरुवारी सोमय्या अधिक माहिती घेणार आहेत. अनिल परब व बजरंग खरमाटे यांच्यावर सोमय्या यांनी सध्या संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याचे जाहीर सांगत ‘सस्पेन्स’ वाढवला आहे. दरम्यान, बारामती तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सोमय्या यांना प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणखी आवश्यक माहिती जमा करण्यासाठी भाजप पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे मोटे यांनी सांगितले. सोमय्या यांनी अनेकांच्या मालमत्ता, भ्रष्टाचाराची भांडाफोड केली आहे. तर आमदार पडळकर हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यामुळे सोमय्या आणि पडळकर प्रथमच बारामतीत एकत्रित येणार आहेत. हे दोन्ही प्रसिध्द नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.