शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

खुटबाव ग्रामपंचायत बिनविरोध

By admin | Updated: July 24, 2015 04:43 IST

१०पंचवार्षिक निवडणुका आतापर्यंत खुटबाग ग्रामपंचायतीने सलगपणे बिनविरोध केलेल्या आहेत.

दौंड : खुटबाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीने बिनविरोधची ५० वर्षांपासून परंपरा जोपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली. गावाच्या एकोप्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. गुलालाची उधळण करीत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. खुटबाव ग्रामपंचायतीने आतापर्यंत १० पंचवार्षिक निवडणुका सलगपणे बिनविरोध केलेल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांचे खुटबाव हे गाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. गावात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन स्थानिक पातळीवर सर्व जाती-धर्मांतील लोक एकत्र आले आणि परंपरेनुसार निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बिनविरोधची परंपरा कायम ठेवण्यासाठी रमेश थोरात यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानुसार उमेदवारांनी कुठलेही आडेवेढे न घेता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज काढून घेतले. त्यामुळे १३ जागा बिनविरोध झाल्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वॉर्ड बिनविरोध झाले होते. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शकुंतला शितकल, मीना चव्हाण, सुनील फणसे यांना पुन्हा संधी मिळाली आहे.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार रमेश थोरात, खुटबाव सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, सरपंच शुभांगी थोरात, शिक्षकनेते जी. के. थोरात यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. बिनविरोध झालेले सदस्य वॉर्ड क्र. १ : शिवाजी थोरात, अशोक चव्हाण, शकुंतला शितकल, वॉर्ड क्र. २ : दशरथ थोरात, कावेरी देशमुख, दत्तात्रय डोमाळे वॉर्ड क्र. ३ : संतोष थोरात, विजय थोरात, सुनीता गिरमे, वॉर्ड क्र. ४ : सुनंदा पवार, मीना चव्हाण, वॉर्ड क्र. ५ : राणी थोरात, सुनील फणसे.