शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केडगाव, बोरीपार्धी ग्रामस्थांची पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:05 IST

या राष्ट्रीय आपत्तीत केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली. कोणी किती पैसे दिले, यापेक्षा संकटात सापडलेल्या माझ्या देशबांधवांना मदत करायची,

केडगाव : केडगाव व बोरीपार्धी ग्रामस्थांनी माणुसकीचा धर्म पाळून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी २ लाख ७० हजार रुपये किमतीचे १० टन तांदूळ पाठविले आहेत. तांदळाने भरलेला टेम्पो नुकताच रवाना झाला. मदतीचा हा तांदूळ रेल्वेने केरळमध्ये जाईल. त्यानंतर यवत येथील टेस्टीबाईट कंपनीचे कर्मचारी पूरग्रस्तांना मदत करतील.

या राष्ट्रीय आपत्तीत केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली. कोणी किती पैसे दिले, यापेक्षा संकटात सापडलेल्या माझ्या देशबांधवांना मदत करायची, या भावनेने ही मदत करण्यात आली. या कार्याला परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांनी हातभार लावला. भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी याकामी पुढाकार घेतला. मदतीचा ट्रक रवाना करण्या प्रसंगी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की केडगाव परिसरातील ग्रामस्थांनी मानवता धर्म पाळत राष्ट्रउभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दौंडमधील इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा. या वेळी किशोर सुंद्राणी यांनी मोफत कपडे, तर म्हेत्रे बुक एजन्सीच्या वतीने पेनांची मदत करण्यात आली. या प्रसंगी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, तानाजी दिवेकर, वामन जाधव, जयप्रकाश आगरवाल, संतोष शेलोत, शंकर चक्रवर्ती, डॉ. माणिक बोरकर आदी उपस्थित होते.मदत निधीचे स्वरूपलोकवर्गणीतून १,१६,३८० रुपयांची मदतच्अनुराज शुगर्स यवत, आनंद थोरात, यशराज एंटरप्रायजेस, काकासाहेब थोरात पतसंस्था, केडगाव व्यापारी असोसिएशन, सुमीत टिळेकर यांच्याकडून प्रत्येकी १ टन तांदूळ.च्धनलक्ष्मी पतसंस्था, बाळासाहेब कोळपे, तानाजी दिवेकर यांच्याकडून प्रत्येकी अर्धा टन तांदूळ

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ