शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

करोना हे जागतिक नाट्य: सुषमा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST

पुणे : ''''''''करोनाचे स्वतंत्र जागतिक नाट्य सुरू झाले आणि जागतिक रंगभूमीवरच्या नाटकाने ''''''''पॉझ'''''''' घेतला. करोनाच्या नाट्यात जगातील प्रत्येक व्यक्तीने ...

पुणे : ''''''''करोनाचे स्वतंत्र जागतिक नाट्य सुरू झाले आणि जागतिक रंगभूमीवरच्या नाटकाने ''''''''पॉझ'''''''' घेतला. करोनाच्या नाट्यात जगातील प्रत्येक व्यक्तीने आपआपल्या पद्धतीने उत्तम काम केले. आज इतक्या महिन्यानंतर रंगभूमी खुली झाल्याने खूप थ्रिल वाटत आहे, अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे यांनी शुक्रवारी केली.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस अँड रिसर्चच्या वतीने १० डिसेंबरपर्यंत आयोजित ''''''''आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल’चे उद्घाटन देशपांडे यांच्या हस्ते एरंडवणे येथील ‘द बॉक्स’ थिएटरमध्ये झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मास्क घातलेल्या आणि सुरक्षित अंतराचा नियम पाळणाऱ्या सुजाण प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा महोत्सव सुरू झाला. तापमान मोजून ठरावीक प्रेक्षकांना थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला. देशपांडे यांच्या हस्ते तिसरी घंटा झाली आणि नाटकासाठी आसुसलेल्या रंगकर्मींनी आणि प्रेक्षकांनी दाद दिली. महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे यांनी प्रास्ताविक केले.

कॉस्टंट अ‍ॅक्ट्स ऑफ डिसओबेइंगची संकल्पना आणि दिग्दर्शन आदिती व्यंकटेश्वरन यांची होती. मारगॉट बॅरेट (फ्रान्स), सायली कुलकर्णी, तन्वी हेगडे व विक्रांत ठकार हे कलावंत सहभागी झाले होते. ‘अव्यक्त’ नाट्यप्रयोगाची संकल्पना आणि दिग्दर्शन आशिष वझे यांचे होते. स्टेफनी कास्त्रेजोन (अमेरिका) व प्रियांका भावे सहभागी झाले होते. गायिका श्रुथी वीणा विश्वानाथ हिची ‘चेंजमेकर’ म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, क्रिएटिव्ह क्रॉसओव्हर या प्रकल्पांतर्गत ''''''''फॉल अगेन, फ्लाय बेटर’ हा एकपात्री प्रयोग ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच आणि सात वाजता होणार आहे. कुमार जोशी स्मृती नाट्यवाचन स्पर्धेतील तमाशा निर्मित ‘आद्रियानो’ आणि निळू फुले कला अकादमी निर्मित ‘खानदानी’ चे वाचन ६ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ रंगकर्मी शुभांगी दामले यांच्या हस्ते होणार आहे.

‌--