शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआय संचालकांच्या नोटिशीला केराची टोपली

By admin | Updated: July 17, 2015 04:19 IST

आंदोलन मागे घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकांनी दिलेल्या नोटिशीला

पुणे : आंदोलन मागे घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकांनी दिलेल्या नोटिशीला विद्यार्थ्यांनी केराची टोपली दाखवत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. नियामक मंडळाच्या अध्यक्षांसह इतर सदस्यांची नियुक्ती कोणत्या निकषांवर केली आहे, हे जोपर्यंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सांगितले जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे स्टुडंट असोसिएशनने म्हटले आहे.एफटीआयआयचे संचालक डी.जे नारायण यांनी बजावलेल्या नोटिशीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर असोसिएशनचे प्रमुख राकेश शुक्ला व विकास अर्स यांनी सांगितले की, मंत्रालयाशी पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. तसा ईमेलही १४ जुलैला पाठविला होता. पण तो मेल मिळाल्याची साधी पोचपावती देखील आम्हाला मिळालेली नाही. यातच अचानक संचालकांकडून आम्हाला आंदोलन मागे घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारचा इशारा देण्यात आला आहे.संचालकांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता?एफटीआयआयचे संचालक म्हणून डी.जे. नारायण यांचा शुक्रवारी शेवटचादिवस आहे. मात्र, नवीन संचालकांच्या मुलाखतींना स्थगिती देण्यात आल्यानेत्या जागी कोणाची नेमणूक करायची? असा प्रश्न शासनासमोर आहे. या आंदोलनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच नव्या संचालकांला नियुक्त करणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे होणार आहे. त्यामुळे आंदोलनाचा प्रश्न सुटेपर्यंत तरी डी.जे. यांनाच काही महिन्यांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.‘सेव्ह एफटीआयआय’कडून आवाहनएफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे नियामक मंडळाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन चुकीचे आहे. नव्या मंडळास वर्षभर काम करण्याची संधी द्यावी. त्यांनी संस्थेसंदर्भात चुकीचे निर्णय घेतले तर विद्यार्थ्यांनी खुशाल आंदोलन करावे. त्या आंदोलनास आम्हीही पाठिंबा देऊ, मात्र सध्या सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घ्यावे, असे आवाहन ‘सेव्ह एफटीआयआय’तर्फे करण्यात आले.