शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कळमोडी धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

लोकमत नूज नेटवर्क राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १.५ टीएमसी साठवण क्षमता असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले ...

लोकमत नूज नेटवर्क

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १.५ टीएमसी साठवण क्षमता असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातून आरळा नदीत तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून घाटमाध्यावर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खेड तालुक्यात कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपूड, परसूल, भोमाळे, घोटवडी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरण्यात मोठी मदत झाली आहे. पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. यामुळे चासकमान धरणातील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होणार आहे. चासकमान धरणातही १ टीमसीने वाढ झाली आहे. भामा आसखेड धरणही ५० टक्के भरले आहे. आराळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानी दिली आहे.

चौकट

दरवाजा विरहित असलेल्या या धरणाच्या सांडव्यावरून सध्या तीन हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी आरळा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १.५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. आरळा नदीत सोडलेल्या पाण्याचा चासकमान धरणात संचय होतो. गेल्या तीन दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे.

फोटो : कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून तीन हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.