शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

काळभैरवनाथ व महालक्ष्मीमाता यात्रा उत्सवाची सांगता

By admin | Updated: February 14, 2017 01:32 IST

येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मीमाता यात्रा उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने करण्यात आली. अखेरची कुस्ती

यवत : येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मीमाता यात्रा उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने करण्यात आली. अखेरची कुस्ती मुंबई महापौर केसरी सागर बिराजदार व किरण भगत यांच्यात झाली. या कुस्तीला ८१ हजार रुपयांचे इनाम देण्यात आले.सलग दोन दिवस सुरू असलेल्या गावाच्या यात्रेची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने होत असते. मोठ्या इनामाच्या कुस्त्यांसाठी यवतच्या यात्रेतील आखाडा प्रसिद्ध आहे. कुस्त्यांच्या आखाड्यात राज्य व परराज्यातील पैलवान मंडळींनी हजेरी लावली होती. अखेरच्या पाच कुस्त्या मानाच्या म्हणून लावण्यात येतात. यात यवतचा मल्ल मंगेश दोरगे विरुद्ध सातारचा शिवाजी जाधव, पुण्याचा किसन शेळके विरुद्ध राहूचा तुषार ठुबे, संदीप काळे विरुद्ध ज्ञानेश्वर बोचडे यांच्यात लावण्यात आल्या. मानाच्या कुस्त्यांमुळे आखाड्याची रंगत वाढली.बारामतीचा अंगद गुदगुले व दिल्लीचा अमित कुमार व हरियानाचा अशोक कुमार व करमाळ्याचा दादा सरोदे यांच्यात चांगल्या लढती पाहण्याची संधी कुस्तीशौकिनांना मिळाली. मंगेश दोरगे, सुजित करडे, प्रदीप कोडीतकर या स्थानिक मल्लांनी कुस्त्या चितपट केल्या. याचबरोबर बारामती येथील कुस्ती समालोचक प्रशांत भागवत यांनी उत्कृष्ट समालोचन करीत आखाड्यातील घडामोडींचे चांगले विश्लेषण केले.या वेळी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, उपसरपंच समीर दोरगे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कोंडिबा दोरगे, माजी सरपंच दशरथ खुटवड, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे, गजानन पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख दोरगे, बाळासाहेब लाटकर, पंडित दोरगे, रमेश जैन, कैलास दोरगे, खंडू दोरगे, गणेश कदम, पापाभाई तांबोळी, दिलीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी शुक्रवारी (दि. १०) यात्रेच्या पहिल्या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यकम झाले. रात्रीच्या वेळी ढोल-ताशे व पारंपरिक वाद्यांच्या ताफ्यांसह देवाची पालखी काढण्यात आली. रात्री कुंदा पाटील पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. (वार्ताहर)