शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम घाटात काजव्यांचे तारांगण

By admin | Updated: June 17, 2014 02:44 IST

शहरांतील कृत्रिम झगमगाटापासून कोसो दूर घनदाट जंगलातील झाडे रात्री चमकत आहेत. मिणमिणणारे हे ‘नैसर्गिक दिवे’ पाहताना डोळे दीपून जात आहेत

नीलेश काण्णव , घोडेगाव (पुणे)शहरांतील कृत्रिम झगमगाटापासून कोसो दूर घनदाट जंगलातील झाडे रात्री चमकत आहेत. मिणमिणणारे हे ‘नैसर्गिक दिवे’ पाहताना डोळे दीपून जात आहेत. आभाळातून जणू तारांगणच उतरल्याची अनुभूती पश्चिम घाटातील भीमाशंकर अभयारण्यात येत आहे. झाडांवरील काजव्यांच्या या संमेलनामुळे ही अतिशय दुर्मीळ आणि स्वर्गीय अनुभूती येत आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी काजवे माद्यांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे चमकतात. इमारतींवर सोडलेल्या लाईटच्या माळा जशा चमकतात, तसे हे हजारो काजवे लुकलुकताना लक्ष वेधून घेतात. लुकलुकणाऱ्या काजव्यांनी बहरलेले झाड पाहताना आपसुक ‘ख्रिसमस ट्री’ची आठवण येते. अशा प्रकारे काजवे चमकणे म्हणजे चांगले नैसर्गिक वातावरण असल्याचे निदर्शक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. मनुष्यवस्तीपासून दूर आणि माणसांचा हस्तक्षेप नसणाऱ्या भागातच अशा प्रकारचे दृश्य सहसा पाहायला मिळते. सध्या या कीटकांचा प्रजननाचा कालावधी आहे.त्यामुळे माद्यांना मिलनासाठी आकर्षित करण्यासाठी नर काजवे चमचम करतात. यातूनच आकर्षक नराची निवड करून माद्या मिलनास तयार होतात आणि हे नैसर्गिक ‘तारांगण’ हळूहळू लोप पावते. हे अनोखो दृश्य पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमींची पावले याठिकाणी वळत आहेत.