शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कडूसला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:09 IST

खेड तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. परंतु, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झालेल्या ...

खेड तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. परंतु, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झालेल्या भरमसाठ उपशामुळे‌ धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पाण्याच्या कृत्रिम टंचाईने मासे मृत्युमुखी पडू लागले आहेत. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ व समाधानकारक पावसाने धरण पुरेपूर भरले होते. गावच्या भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने एप्रिल मध्यापर्यंत पाणी टंचाई जाणवली नाही. मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. परिसरातील जलस्रोत आटत आहेत. त्यामुळे गावठाण व परिसरातील वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. धरणाच्या पायथ्याच्या विहिरीतून, साठलेल्या पाण्याचा, ग्रामपंचायतीने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. कुमंडला नदी कोरडी ठणठणीत पडल्याने गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडूस व गरजूंना व परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनचे मार्गदर्शन आवश्यक आहे. विधनविहिरी खोदणे,गाळ काढणे, गावातील अन्य पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे. ह्यामुळे भर, उन्हाळ्यातही पावसाळ्यांपर्यत पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता कमी होईल असे वाटते.

---------------------------

कोट -१

पाणीपुरवठा टाकीत पाणी घेण्यासाठी भीमा नदीच्या पात्रातून पाईप लाईन टाकण्याचे काम चालू असून, नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही याकरिता ग्रामपंचायतीचे तातडीचे प्रयत्न चालू आहेत.

- निवृत्ती नामदेव नेहेरे, सरपंच, ग्रामपंचायत कडूस.

--

कोट -२

मातीबंधाऱ्यातील गाळ काढल्याने पाण्याचा साठ्यात वाढ होऊन शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. सेवाभावी उद्द्योजकाकडून मदतीसाठी संस्था प्रयत्न करीत आहे.

- दिलीप ढमाले चेअरमन. भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था कडू.

--

फोटो क्रमांक : १५कडूस पाणीटंचाईच्या झळा

फोटो ओळी : कडूस (ता. खेड) येथील छोट्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.