शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

By admin | Updated: September 17, 2015 02:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांच्या खांद्यावरून शिवसेनेने अचूक निशाणा साधला आणि सत्ताधारी संजय काळे यांच्या शिवनेर पॅनलचा दारुण पराभव केला. जुन्नर कृषी उत्पन्न

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांच्या खांद्यावरून शिवसेनेने अचूक निशाणा साधला आणि सत्ताधारी संजय काळे यांच्या शिवनेर पॅनलचा दारुण पराभव केला. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने १९ पैकी १२ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवनेर पॅनलला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपा पुरस्कृत शिवनेर सहकार परिवर्तन पॅनलला खातेही उघडता आले नाही.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाल्याने बुधवारी निकालासाठी अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांनी एक होऊन शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे केले. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले. विजयानंतर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषी मिरवणूक काढली.व्यापारी गटातून पहिला धक्कादायक निकाल मिळाला. व्यापारी मतदार संघातून शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे धनेश संचेती हे विजयी झाले; मात्र त्यांचेच सहकारी हरिभाऊ गुंजाळ यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवनेर पॅनलचे नासीर मणियार हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन व्यापारी मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर मात्र शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने ग्रामपंचायत मतदार संघातून आपली घोडदौड कायम ठेवत सर्वच्या सर्व जागा पटकाविल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेले बाजार समितीचे विद्यमान उपसभापती धोंडिभाऊ पिंगट, विद्यमान संचालक रघुनाथ लेंडे, शिरीष बोऱ्हाडे, तर तिकीट वाटपातून डावललेले विद्यमान संचालक धनेश संचेती व निवृत्ती काळे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवीत आपली जनमानसातील ताकद सिद्ध केली.सोसायटी मतदार संघाच्या महिला राखीव गटात शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या हिराताई चव्हाण व सुमन बोऱ्हाडे यांनी, तर इतर मागासवर्गीय गटातून निवृत्ती काळे व एनटी गटातून विद्यमान उपसभापती यांनी बाजी मारली. सोसायटी मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात मात्र सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. विद्यमान सभापती संजय काळे यांनी सर्वाधिक ५११ मते घेऊन विजयी झाले; मात्र सहकाऱ्यांना आपल्यासोबत विजयी रांगेत ओढण्यास ते कमी पडले. शेतकरी विकास पॅनलचे महेंद्र मोजाड व शरद चौधरी यांचा अवघ्या मतांनी पराभव झाल्याने पॅनलच्या वरिष्ठ नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. ही मागणी निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी मान्य केली. (वार्ताहर)- सविस्तर वृत्त पान ४