शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर नगरपालिकेच्या विकासकामांची होणार चौकशी

By admin | Updated: March 10, 2017 04:41 IST

शहरात नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कामकाजाबाबत झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित कामांची चार सदस्यीय

जुन्नर : शहरात नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कामकाजाबाबत झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित कामांची चार सदस्यीय कमिटीद्वारे चौकशी करण्यात यावी, तसेच याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असा आदेश पत्राद्वारे दिला आहे.माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास मंत्रालय यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासन शाखा पुणे यांच्या वतीने हे पत्र जुन्नर उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. चार सदस्यांची चौकशी समिती राहणार असून समितीचे प्रमुख म्हणून जुन्नरचे उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, नगररचनाकार पुणे तसेच आळंदी नगरपालिकेचे लेखा परिक्षण अधिकारी यांचा समितीत समावेश आहे.तक्रारदाराने केलेल्या आरोपांची दखल घेऊन जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांची या समितीकडून चौकशी करण्यात यावी व याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे.कर आकारणीचे कामकाज खाजगी एजन्सीमार्फत करून नगरपालिकेचे आर्थिक नुकसान , रेनवॉटर हार्वेस्टिंग युनिट्सच्या कामात २६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार, आॅनलाईन निविदेचा फार्स, रेनवॉटर हार्वेस्टिंगकरिता बोअर वेल घेण्यात आल्या; परंतु बोअरसाठी अद्याप वीजजोड घेण्यात आलेले नाहीत. शिवनेरी किल्ला परिसर विकास योजनेतून शहरात एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ६५ लाख ७८ हजार रुपयांची निविदा मागविण्यात आली. प्रत्यक्षात आॅनलाईन निविदेचा फार्स करण्यात आला. यातही भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचीही तक्रार कदम यांनी केली होती. पाइप गटारयोजनेचे कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. (वार्ताहर)