शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर परिसरात अफवांचे पेव!

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

ओझर, खोडद, ओतूर, मढ आणि परिसरातील गावांमध्ये घरफोडी व मारहाणीच्या अफवांमुळे गावांतील महिला व लहान मुलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. भीतीमुळे आबालवृद्धांची झोप उडाली आहे.

ओझर : ओझर, खोडद, ओतूर, मढ आणि परिसरातील गावांमध्ये घरफोडी व मारहाणीच्या अफवांमुळे गावांतील महिला व लहान मुलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. भीतीमुळे आबालवृद्धांची झोप उडाली आहे. 
प्रत्यक्षात कोणत्याही गावात चोरी अथवा मारहाणीचा प्रकार घडला नाही. परंतु सोशल मीडियाचा 
या अफवांसाठी वापर होत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी 
केले आहे.
या अफवांचा प्रत्यक्षात त्रस 
हा रात्रभर गस्त घालणा:या 
शेकडो तरुण, पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांना होत 
आहे. कोणत्याही गावातून 
फोन आल्याबरोबर पोलिसांची 
गस्त पथक गाडी त्या ठिकाणी 
तत्काळ पोहोचते. परंतु, प्रत्यक्षात 
त्या ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नसते. 
हा प्रकार गेली चार ते पाच दिवस सातत्याने सुरु आहे.
14 सप्टेंबर रोजी रात्री 7.45 वा. शिरोली खुर्द येथील शेरी वस्तीत शेतामध्ये चोर लपून बसल्याची अफवा पुढे आली. तातडीने ही खबर गावभर पोहोचली. 
जुन्नर पोलीस स्टेशनला तत्काळ फोन झाला. पोलीस स्टेशनची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. 
शेकडो ग्रामस्थ जमा झाले; परंतु प्रत्यक्षात काहीही हाती लागले नाही. 
हा हा म्हणता ही बातमी वा:यासारखी सोशल मीडियाद्वारे तालुकाभर पसरली. 
त्याचबरोबर ओझर, तेजेवाडी, शिरोली खुर्द, कुमशेत, नेतवड, माळवाडी, हापूसबाग, आगर, बल्लाळवाडी, उदापूर या गांवामध्ये पोहोचल्याबरोबर गावातील शेकडो तरुण काठय़ा, बॅटरी घेऊन आपापल्या गावांत रस्त्यावरती गस्तीसाठी जमा झाले. 
(वार्ताहर)
 
4शिरोली खुर्द येथील शेरी वस्तीत शेतामध्ये चोर लपून बसले.
4कुसूर या ठिकाणी दरोडा 
पडला आहे. 
4शिरोली खुर्दमध्ये घरामध्ये घुसून महिलेचे हात तोडले 
अशा  बोगस अफवांचे पेव फुटले आहे. परंतु प्रत्यक्षात हे प्रकार घडला नसल्याचे जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजया मेहेत्रे यांनी सांगितले. 
 
नागरिकांनी 
अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. पोलिसांची गस्तपथक गाडी रात्रभर फिरती असून, नागरिकांनी घाबरून न जाता रात्री- अपरात्री कोणत्याही प्रकारचे मदतीसाठी जुन्नर पोलीस ठाण्याच्या क्2132-222क्33 या क्रमांकावर संपर्क साधावा
- कैलास पिंगळे  
सहायक पोलीस 
निरीक्षक, जुन्नर