शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन आठवड्यांत जम्बो @ ५५० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरदान ठरलेले जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत ५५० रुग्णांवर ...

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरदान ठरलेले जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत ५५० रुग्णांवर जाऊन पोचले आहे. येत्या दोन दिवसांत जम्बोमधील खाटा ६०० पर्यंत नेण्यात येणार असून, हळूहळू पूर्ण क्षमतेने उपचार सुरू केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रुग्णांची संख्या कमी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जशी गंभीर परिस्थती निर्माण झाली होती, तशी स्थिती पुन्हा उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे.

गंभीर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यांच्यावर उपचारांसाठी पालिकेकडून व्यवस्था करण्यात येत आहे. जम्बोसोबतच आणखी चार कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय व्यवस्थेचे कामकाज मेडिब्रोस या एजन्सीकडून केले जात आहे. जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मार्चपासून रुग्णालय सुरू करण्यात आल्यानंतर दोन आठवड्यांत येथील रुग्णसंख्या ५५० वर पोचली आहे. मंगळवारी आणखी ५० खाटा वाढविण्यात येणार आहेत. जम्बोमध्ये या ठिकाणी एक कार्डिअक आणि साधी अशा दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

---

अखंड एसी सुरू ठेवावा

जम्बो रुग्णालयासाठी अखंड एसी सुरू ठेवावा लागत आहे. यासोबतच जनरेटरही कायम सुरू असतो. उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्णता वाढून ही उपकरणे बिघडू नयेत अथवा आगीच्या घटना घडू नयेत याकरिता खबरदारी घेतली जात आहे. या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांसह एक बंब २४ तास तैनात करण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले.