शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या खेळीचा आनंदच वेगळा

By admin | Updated: May 26, 2017 03:24 IST

गेल्या दीड महिन्याच्या आयपीएल सत्रात मला जो काही अनुभव मिळाला, तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये बदल घडविणारा आणि मुख्य म्हणजे माझा आत्मविश्वास वाढविणारा होता

शिवाजी गोरेलोकमत न्यूज नेटवर्कगेल्या दीड महिन्याच्या आयपीएल सत्रात मला जो काही अनुभव मिळाला, तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये बदल घडविणारा आणि मुख्य म्हणजे माझा आत्मविश्वास वाढविणारा होता, असे रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा आघाडीचा फलंदाज राहुल त्रिपाठीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संघात कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, बेन स्टोक यांच्याबरोबर खेळताना कसे वाटले, असे विचारले असता राहुल म्हणाला, ‘‘या सगळ्यांची फलंदाजीची, क्षेत्ररक्षणाची शैली वेगवेगळी आहे. यांच्याबरोबर खेळताना मला जो काही अनुभव मिळाला, ती माझी आयुष्याची पुंजी ठरणार आहे. या सर्वांकडून फलंदाजीच्या वेळी खेळपट्टीवर असताना ज्या मला लहानसहान गोष्टींची जाणीव करून देत होते त्याचा मला भावी क्रिकेट आयुष्यात नक्कीच फायदा होईल. एवढ्या उच्च दर्जाचे खेळाडू आपल्या ज्युनिअर सहकाऱ्याला कसे समजून आणि सांभाळून घेतात, याचासुद्धा अनुभव खूपच सुखद होता. माझ्या प्रत्येक खेळीच्या वेळी स्मिथ, रहाणे, धोनी, स्टोक यांच्याकडून ज्या टिप्स मिळाल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या.’’मार्गदर्शक स्टीफन फ्लेमिंग व हृषीकेश कानेटकर यांच्याबाबत विचारले असता राहुल म्हणाला, ‘‘फ्लेमिंग सर तर ग्रेटच होते. त्यांचा प्रत्येक खेळाडूकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. या खेळाडूकडून आपण उत्कृष्ट खेळी कशी करून घेऊ, याचा ते बारकाईने अभ्यास करीत. फलंदाजीच्या वेळी होत असलेल्या बारीक-बारीक चुकांकडे त्यांचे लक्ष होते आणि त्या चुका कशा सुधारता येतील, याचे ते योग्य मार्गदर्शन करीत. फलंदाजीच्या वेळी कोणता गोलंदाज कोणत्या प्रकारे गोलंदाजी टाकेल आणि ते कसे ओळखायचे, हेसुद्धा या दिग्गज खेळाडूंकडून मला शिकायला मिळाले.’’ उत्कृष्ट खेळाडू जर व्हायचे असेल, तर सर्वप्रथम आपली तंदुरुस्ती सिद्ध करायला हवी, असे सुद्धा फ्लेमिंग सर सांगायचे.वयाच्या १३व्या वर्षापासून डेक्कन जिमखाना संघाकडून खेळणाऱ्या राहुलला शतक हुकल्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘‘मी ज्या वेळी फलंदाजीला गेलो त्यावेळी मनात धावा करू शकेल, असे कधीच वाटले नव्हते. पण, सुरुवातीला समोर असलेल्या अजिंक्य रहाणेने जे मार्गदर्शन केले आणि संयमाने फलंदाजी करण्यास सांगितले तेव्हा मी ९३ धावांपर्यंत मजल मारली. शतक हुकल्याचे मला थोडे दु:ख होते; पण मोठी खेळी केल्याचा आनंद एक वेगळाच होता.’’