शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जिरणार ‘अब्ज’ रुपये

By admin | Updated: February 15, 2017 01:56 IST

जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणूकांसाठी उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी करण्यात येणारा जाहीरात खर्च, कार्यकर्त्यांच्या

पुणे : जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणूकांसाठी उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी करण्यात येणारा जाहीरात खर्च, कार्यकर्त्यांच्या भोजनावळी, झेंडे, उपरणी, बॅनर, अहवाल यावर होणाऱ्या रुपयाचा वैध आकडा धरला तरी तो, १२० कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो. सध्या विविध वस्तूंचे भाव जरी लक्षात घेतले, तरी हा खर्च किमान दोन अब्जांवर असेल, असेच दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. प्रत्येक उमेदवाराने हा निधी खर्च केल्यास किमान १२० कोटी २० लाख रुपये खर्च होतील. अर्थात दहा लाख रुपयांच्या आत खर्च करणारे काही सन्माननीय अपवादही असतील. मात्र त्याचप्रमाणे अनेकदा दाखविला जाणारा खर्च आणि प्रत्यक्ष होणारा खर्च यात बरीच तफावत असल्याचे सहज लक्षात येते. काही जणांनी तर प्रचारासाठी पक्षाच्या चिन्हाचा रथच तयार केला आहे. काहींनी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेत चित्रफित केली आहे. अनेक उमेदवारांनी घोषणा लिहून देण्यासाठी व्यावसायिक लेखकांची मदत घेतली आहे. या शिवाय छापील अथवा डिजिटल मतदार स्लीप देण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आहे. काहींनी डिजिटल स्लीप वाटपासाठी ८ ते नऊ हजार रुपयांचे यंत्र देखील खरेदी केले आहे. पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी चिन्ह असलेली उपरणी, टोप्या, बॅच-बिल्ले, झेंडे, पेशवाई पगड्या यांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असून, प्रत्येक उमेदवार सरासरी शंभर ते दोनशे उपरणे, बॅच आणि बिल्ल्यांची खेरदी करीत आहे. बाजारात बॅचची किंमत २ ते १०० रुपये, पक्ष चिन्ह असलेली टोपी १० ते ३५, उपरणी ७ ते साडेतीनशे रुपये, तर पेशवाई पगडीची किंमत १ हजार ते २ हजार रुपयांदरम्यान आहे. या शिवाय पक्ष चिन्हाच्या कट आऊटसाठी आकारानुसार ५० ते दोनशे रुपये दर असल्याची माहिती मुरूडकर झेंडेवाले’चे गिरीष मुरूडकर यांनी दिली.