---
पुरूषांनी स्त्रीचा सन्मान करावा : डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : महाराष्ट्राची अस्मिता, देशाचे, राज्याचे रक्षण, स्वधर्माचे, रयतेचे रक्षण, त्याच बरोबर महाराष्ट्र एक लढाऊ राज्याची ओळख शिवाजी महाराजांनी दिली. आणि त्यांच्यावर संस्कार करून स्वतःचे आयुष्यात त्याग करुन इतिहास घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ साहेबांनी केले. आजच्या या दिवशी महिलांनी स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे व पुरूषांनी स्त्री चा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. अशी भावना महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे नीलम यांनी व्यक्त केले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, सविता मते, नगरसेविका संगीता ठोसर, सविता बलकवडे, कस्तुरी पाटील, शिरीष फडतरे, स्वाती धमाळे, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे, शेलार गुरूजी, अनिता शिंदे, जयश्री सिरसाट, उपस्थित होते.