पुणे : सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तोतया ग्राहकाने दुकानातील ३ लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भुपेन्द्र अमृतलाल जव्हेरी (वय ४९, रा. गंगापुरम, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. जव्हेरी यांचे विमाननगरमधील फिनिक्स मॉलमध्ये मलबार गोल्ड ॲंड डायमंड नावाचे दुकान आहे. खरेदीच्या बहाण्याने या तोतया ग्राहकाने दुकानात प्रवेश करुन आपले नाव राकेश शहा असल्याचे सांगितले. सोन्याच्या दोन चेन, एक ब्रेसलेट आणि एक पेंडंट असा एकूण ३ लाख १० हजार १९० रुपयांचा ऐवज त्याने घेतला. आपण एका हॉटेलमध्ये उतरल्याचे सांगून पैसे घेण्यासाठी जव्हेरी यांना हॉटेलमध्ये बोलावले. जव्हेरी यांच्याकडून हे दागिने घेऊन चोरटा पसार झाला.
तोतया ग्राहकाने लांबवले दागिने
By admin | Updated: May 31, 2014 22:06 IST