शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी नगराध्यक्षपद होणार रद्द

By admin | Updated: June 22, 2017 07:19 IST

तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले जातीचे

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे. यामुळे वीणा सोनवणे यांचे नगराध्यक्षपद रद्द ठरणार आहे. यासंदर्भात सोनवणे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली असल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी जेजुरी नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्यात आले. निवडणुकीत जेजुरीचे नगराध्यक्षपद इतर मागास वर्ग जातीसाठी राखीव होते.राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनल जयदीप बारभाई यांचा पराभव करीत कॉँग्रेसच्या वीणा सोनवणे या विजयी झाल्या होत्या. विद्यमान नगराध्यक्षा सोनवणे यांनी वाणी समाजाच्या असल्याचे जातीचे प्रमाणपत्र खोटे दिल्याची तक्रार मीनल बारभाई आणि नगरसेवक जयदीप बारभाई यांनी अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव एस. एन. डावखर, सदस्य एस. आर. दाणे आणि अध्यक्ष पी. टी. वायचळ या समितीपुढे जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली. समितीपुढे स्वत:च्या जातीचे अधिकृत प्रमाणपत्र वैध असल्याचे योग्य ते पुरावे नगराध्यक्षा सोनवणे सादर करू न शकल्याने समितीने त्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द ठरवले असून, पुढील कार्यवाहीसाठी समितीने पुणे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी पुरंदर, पुरंदर तहसीलदार तसेच जेजुरी मुख्याधिकाऱ्यांकडे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाकडून जो निर्णय होईल तो आपणास मान्य असेल, असे सोनवणे यांनी म्हटले आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात सुनावणी होईल.