शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जेजुरी बसस्थानक बनले समस्यांचे आगार

By admin | Updated: April 26, 2017 02:51 IST

तीर्थक्षेत्र जेजुरी येथील एसटी बसस्थानकावर असुविधांबरोबरच अस्वच्छता आणि दुर्गंधी नित्याचीच बाब बनली आहे.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथील एसटी बसस्थानकावर असुविधांबरोबरच अस्वच्छता आणि दुर्गंधी नित्याचीच बाब बनली आहे. बसस्थानकात मूलभूत सुविधांची वानवा असल्याने देशभरातून खंडोबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे.अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत एसटी बसस्थनाकात प्रवाशांसाठी असुविधाच असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीच जास्त आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुमारे ३ एकर क्षेत्रफळाचे हे बसस्थानक असून त्याची उभारणी ४३ वर्षांपूर्वी सन १९७४ साली झालेली आहे. येथून दररोज पुण्याला ३१० जाणाऱ्या व ३२० येणाऱ्या अशा बसेस ये-जा करतात. दररोज सुमारे ६ हजार ५०० प्रवासी येथे चढतात-उतरतात. रविवारी सर्वाधिक गर्दी असते. ६० जास्तीच्या गाड्या रविवारी सोडण्यात येतात. यात सुमारे ४५०० प्रवासी प्रवास करतात. यात्राकाळात ही संख्या जास्त असते. बसही ७५ ने वाढतात, अशी माहिती बसस्थानक प्रमुख एस. एस. जोशी आणि एस. एस. जगताप यांनी दिली. बसस्थानकांच्या सोयी सुविधांबाबत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या बसस्थानकाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे. जीर्ण झालेली इमारत, पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. उपहारगृह आहे पण ते कायमच बंद असते. प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. एक स्वच्छतागृह आहे ते बीओटी तत्त्वावर चालवण्यास दिलेले आहे. त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. स्वच्छतेसाठी एकच सफाई कामगार आहे आणि एक सुरक्षा कर्मचारी आहे. यांच्यावरच हे सर्व अवलंबून आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने वर्दळ जास्त आहे. यामुळे अस्वच्छता दिसते. सुलभ शौचालय मात्र खासगी ठेकेदार कंपनीला बांधा, वापरा, हस्तांतरण करा या तत्त्वावर चालवायला दिलेले आहे, असे असतानाही स्थानक परिसर अस्वच्छ आहे. संपूर्ण इमारत जीर्ण झालेली असून भिंतींनाही तडे गेलेले आहेत. आतील स्वच्छतागृहे ही बंद आहेत. पुरुषांसाठी १० स्वछतागृहे व २ स्नानगृहे आहेत. महिलांसाठी ४ स्वच्छतागृहे असून याही स्वच्छतागृहांची अवस्था ही अत्यंत दयनीय स्वरूपाची आहे. येथे एवढ्या असुविधा असूनही येथे अंघोळीसाठी २० रुपये आणि स्वच्छतागृहासाठी ७ रुपये आकारले जातात. तेही नियमापेक्षा जास्तच आकारले जात आहे. पाण्याचीही व्यवस्था नाही. पाणीपुरवठा ही व्यवस्थित नसल्याने स्वच्छतागृहे ही दुर्गंधीयुक्त बनले आहेत. या संदर्भात शौचालयातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्याच्याकडून काहीच माहिती मिळू शकलेली नाही. सुलभ शौचालयाचा ठेकेदार तर इकडे कधी फिरकतही नसल्याचे समजते. बसस्थानकातील उपहारगृह कित्येक वर्षांपासून बंद आहे. उपहारगृहचालक सोडून गेला आहे. नवीन चालक येईपर्यंत ते बंदच राहणार असल्याचे समजते. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे बसस्थानक सर्व सुविधांयुक्त असणे गरजेचे आहे. त्यासाठी जागाही खूप मोठी आहे. मात्र एसटी महामंडळाला याकडे लक्ष द्यायला वेळच नसावी. यामुळे प्रवाशांतून मोठी नाराजी आहे. दीड वर्षांपूर्वी जेजुरीतील नागरिकांनी व काही नगरसेवकांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन बसस्थानकात असलेल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या होत्या. स्थानकात रात्रीच्या वेळी रखवालदाराचा अभाव, घाणीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांची दुरवस्था, स्नानगृहांची आवश्यकता, बसस्थानक आवाराचा परिसर दिवसेंदिवस वाढत असलेली भाविकांची गर्दी, मुक्कामी गाडी नसणे. पुणे येथे सकाळच्या वेळी जाणाऱ्या ग्रामस्थांना-विद्यार्थ्यांना वेळेत गाडी नसल्याने उद्भवणारी समस्या आदींबाबत माहिती नामदार दिवाकर रावते यांना देण्यात आली.