शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जयंत म्हाळगी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - गिरीवन प्रकल्प आर्थिक फसवणूक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST

पुणे : गिरीवन प्रकल्पात इतरांच्या मालकीच्या जमिनीचा ताबा देऊन अनेक प्लॉटधारकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गिरीवनचे संचालक ॲड. जयंत ...

पुणे : गिरीवन प्रकल्पात इतरांच्या मालकीच्या जमिनीचा ताबा देऊन अनेक प्लॉटधारकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गिरीवनचे संचालक ॲड. जयंत म्हाळगी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी नुकताच फेटाळला आहे. पौड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात अभिनेते विक्रम गोखले, जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी यांच्यासह आणखी किमान २५ जणांचा सहभाग असून त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारदार जयंत बहिरट व इतरांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

गिरीवन प्रकल्पात फसवणूक झालेल्यांच्या वतीने ॲड. इंद्रिजतसिंग गिल यांनी माहिती दिली. होतले आणि डोंगरगाव येथील शेत जमीन खरेदी विक्रीत अनेक प्लॉट धारकांना गिरीवन प्रकल्प कायदेशीर असल्याचे भासवून शेत जमिनीचे बेकायदेशीर प्लॉटिग करुन प्लॉटधारकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. जमिनीची शासकीय मोजणी झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे. अनेकांना खरेदी खतात दाखविलेली जागा व प्रत्यक्ष ताबा दिलेली जागा वेगवेगळ्या आहेत. अनेकांना खरेदी केल्यापेक्षा जमिनीपेक्षा कमी जागा देण्यात आली. लोकांना जमिनीची खरेदी करुन देताना ती कंपनीकडून नाही तर वेगळ्या लोकांच्या नावावर ही जागा दाखविली आहे. आमच्या टीमने या सर्व तक्रारदारांकडील कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीने आपल्या वेबसाईटवरुन अनेक व्हिडिओ, कागदपत्रे काढून टाकल्याचे ॲड. गील यांनी सांगितले.

ज्यांनी या प्रकल्पात जमिनी घेतल्या, त्यांना क्रिलयर टायटल मिळाले नसल्याने त्यांना या जमिनी विकताही येत नसल्याचे तक्रारदारांनी यावेळी सांगितले.

सत्र न्यायालयाने यापूर्वी अभिनेते विकम गोखले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या गुन्ह्यात पोलीस कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा युक्तीवाद ग्राह्य धरुन ॲड. जयंत म्हाळगी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला असल्याचे ॲड. गिल यांनी सांगितले.