शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकमध्ये महाआघाडीचे जयंत आसगावकर यांची शेवटच्या फेरीपर्यंत झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST

- प्रतिस्पर्धी सावंत यांच्या मतांवर आसगावकराचा कोटा पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे जयंत ...

- प्रतिस्पर्धी सावंत यांच्या मतांवर आसगावकराचा कोटा पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी 33 फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुस-या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी 25 हजार 985 मते घेतल्याने अखेर तब्बल 36 तासानंतर विजय निश्चित झाला.

राज्यात पुणे शिक्षक मतदार संघाचा निकाल सर्वात अगोदर जाहिर होईल अशी अशा होती. त्यानुसार मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरू होती. एकूण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने वैध, अवैध आणि पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यासाठी गुरूवारी रात्रीचे साडेआकरा वाजले. यामध्ये शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला 25 हजार 114 हा अकडा पार करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुरूवातीपासूनच आघाडीवर आसलेले आसगावकर यांना पहिल्या पसंतीत केवळ 16 हजार 874 मते मिळाली. यामुळे नियमानुसार निवडणूक यंत्रणेला दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यामध्ये देखील 33 व्या फेरीपर्यंत आसगावकर यांना 25 हजारांचा कोटा पूर्ण करता आला नाही. 33 व्या फेरीत आसगावकर यांना 22 हजार 345, सावंत यांना 15 हजार 357 तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची 34 फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत 25 हजार 985 मते घेतली. तर सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय झाला.

--------

ऑन ड्युटी 36 तास

पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची मतमोजणी गुरूवार (दि.3) रोजी सकाळी 7.30 वाजता पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सुरू झाली. यात सर्वाधिक मतदान व उमेदवार असलेल्या पदवीधर मतदार संघात विजयी उमेदवार यांनी पहिल्याच पसंतीत विजयी मतांचा कोटा पूर्ण केल्याने शुक्रवारी पहाटे पदवीधरची मतमोजणी पूर्ण झाली. पण शिक्षक मतदार संघात विजयी उमेदवाराला मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी शेवटच्या 34 फेरीपर्यंत मतमोजणी करावी लागली. यामुळे शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल 8 शुक्रवार (दि.4) रोजी रात्री 8 वाजता जाहीर झाला. यामुळे मात्र संपूर्ण यंत्रणा 36 तास ऑन ड्युटीवर होते.

-------

पहिल्या पसंती सर्वाधिक मते मिळविणारे पहिले दहा उमेदवार पसंतीत पडलेली मते

1) जयंत आसगावकर ( विजयी उमेदवार) : 16874

2) दत्तात्रय सावंत (विद्यमान शिक्षक आमदार) : 11024

3) जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत) : 5795

4) गोरखनाथ थोरात : 4515

5) प्रकाश पाटील : 2365

6) रेखा पाटील : 1689

7) तानाजी नाईक : 696

8) नंदकिशोर गायकवाड : 643

9) नितीन पाटील : 637

10) सुभाष जाधव : 610

------''''''''