शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबार आयुक्तांच्या कक्षात

By admin | Updated: June 14, 2014 01:17 IST

नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी पोलीस आयुक्तांचा सुरू करण्यात आलेला जनता दरबार आता थेट आयुक्तांच्या कक्षात भरणार आहे

पुणे : नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी पोलीस आयुक्तांचा सुरू करण्यात आलेला जनता दरबार आता थेट आयुक्तांच्या कक्षात भरणार आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडताना गैरसोयीचे होऊ नये म्हणून आयुक्तांशी वैयक्तिक पातळीवर आता तक्रारदारांना बोलता येणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच पोलीस आयुक्तांनी काढला आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत जनता दरबार असतो. स्थानिक पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास अनेक नागरिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडतात; परंतु आयुक्तालयाच्या पहिल्या मजल्यावर भरणाऱ्या या दरबारावेळी अन्य तक्रारदार आणि पोलिसांसमोर बोलताना अनेकांची अडचण व्हायची. तसेच आपला मुद्दा थेट मांडणे तक्रारदार टाळत असत, त्यामुळे तक्रारदारांची ही गैरसोय टाळण्यासाठी एकेका तक्रारदाराला आयुक्तांच्या कक्षात बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्या वेळी पोलीस आयुक्त उपलब्ध नसतील, अशा वेळी सह पोलीस आयुक्त तक्रारदारांना भेटणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना आपला मुद्दा थेट पोलीस प्रमुखांसमोरच मांडता येणार आहे. न्यायाच्या अपेक्षेने तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या पदरात या निर्णयामुळे काय पडते, हे पाहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)