शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अकरा धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:34 IST

जिल्ह्यातील २५ धरणांपैकी प्रमुख मोठी अकरा धरणे भरली आहेत. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुणे : जिल्ह्यातील २५ धरणांपैकी प्रमुख मोठी अकरा धरणे भरली आहेत. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.येडगाव, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत आणि खडकवासला आणि वीर यापैकी काही धरणे भरली, तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत.धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन आठवड्यांपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. सध्या पाऊस ओसरला असला, तरी धरण साखळीत पाण्याचा ओघ सुरूच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर एकूण २३.६९ टीएमसी म्हणजेच, ८१.२६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला २४ टक्के, तर जवळपास सात टीएमसी पाणीसाठा अधिकचा झाला आहे.मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे धरण परिसरात डोंगर, दºयांमधून पाणी चांगल्या प्रमाणात येत आहे. विशेषत: मागील आठवड्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने मोठी वाढ झाली. यामुळे आजअखेर जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.सध्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी चांगला पाणीसाठा झाल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या खडकवासला आणि पानशेत धरण शंभर टक्के भरले आहे, तर वरसगाव धरणाचा पाणीसाठा ७२.८४ टक्क्यावर गेला आहे. टेमघर धरण ५२.५१ टक्के भरले आहे.जिल्ह्याातील बहुतेक धरण परिसरात मागील चार दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. टेमघर धरणाच्या परिसरात केवळ १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत आणि खडकवासला आणि वीर यापैकी काही धरणे भरली, तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत.कुकडी प्रकल्पातील तीन धरणे भरण्याच्या मार्गावरकुकडी प्रकल्पातील प्रमुख धरणांपैकी येडगाव (८७.८५ टक्के), डिंभे (९१.०१ टक्के), तर घोड (८२.३७ टक्के) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत, तर माणिकडोह (५२.४२ टक्के) आणि वडज (७१.७३ टक्के) या धरणांत निम्म्याच्यावर पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर पिंपळजोगा धरण परिसरात पावसाने ओढ दिल्याने अद्याप निम्म्यापेक्षा (३५.०७ टक्के) इतका कमी पाणीसाठा आहे.उजनी धरणात ४१.७५ टक्के पाणीसाठाउजनी धरण परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे; मात्र खडकवासला प्रकल्पातील धरण साखळी परिसरात मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या उजनी धरणात ४१.७५ टक्के इतका म्हणजे २२.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांबरोबर आणि शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांसाठी या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने होतो.डिंभे धरणात ९१ टक्के पाणीसाठाडिंभे धरणाची पाणीपातळी आजमितीस ७१७.२५० एवढी झाली असून, धरणात ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊ लागल्याने सुरक्षिततेच्या कारणासाठी धरणाच्या तीन दरवाजांतून, तर काल शुक्रवारी रात्री पासून पाचही दरवाजांमधून पाणी सोडण्यात येते होते. शनिवारी दुपारी तीन वाजता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. केवळ पॉवर हाऊसमधून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात केवळ ४४ टक्के एवढाच पाणीसाठा झाला होता. यंदा आजच्या तारखेपर्यंत धरण पाणलोटक्षेत्रात ८३६ मीमिएवढा पाऊस झाला आहे. गरज पडल्यास पुन्हा कोणत्याही क्षणी धरणातू विसर्ग सुरू केला जाणार आहे.