शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकाच्या हत्येची तुरुंगातील गुंडाला सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर-पाषाण प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची सुपारी तुरुंगात असलेल्या गुंडाला दिल्याचे उघडकीस आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बाणेर-पाषाण प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची सुपारी तुरुंगात असलेल्या गुंडाला दिल्याचे उघडकीस आले आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुंड अनिल यशवंते आणि त्याचे साथीदार आणि खुनाची सुपारी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

‘राष्ट्रवादी’च्या या नगरसेवकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २२ व २३ डिसेंबरच्या दरम्यान घडली. या नगरसेवकांच्या मुलाला एकाने फोनद्वारे व समक्ष भेटून तुमच्या वडिलांवर खुनी हल्ला करण्यासाठी बाणेरमध्ये काही मुले आले असल्याची माहिती दिली. हे काम करण्याची सुपारी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला गुंड अनिल यशवंते याला देण्यात आल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

या नगरसेवकाची पत्नी रात्री घराचे गेट बंद करत असताना गेटजवळ एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी उभी होती. त्यामध्ये वाहनचालक व मागे एक व्यक्ती शाल गुंडाळून बसलेली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीने कोण पाहिजे असे विचारल्यावर ते काही उत्तर न देता गाडी मागे घेत निघून गेले.

मुलाला मिळालेली माहिती आणि घरासमोर घडलेला हा प्रकार या लक्षात घेऊन या नगरसेवकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी १२० ब, ११५, ५०६/२, ३४ कलमांखाली गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.