शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा स्वीकृत नगरसेवकपदी जाधव, कविश्वर, आगरवाल

By admin | Updated: January 12, 2017 02:44 IST

लोणावळा नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत) नगरसेवकपदी भाजपाच्या गटातून जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत) नगरसेवकपदी भाजपाच्या गटातून जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब जाधव, काँग्रेसच्या गटातून निखिल कविश्वर, तर शिवसेनेच्या गटातून अनपेक्षितपणे नितीन आगरवाल यांनी नियुक्ती जाहीर करण्यात आली.नगर परिषद सभागृहात बुधवारी निवडप्रक्रिया पार पडली. पक्षीय बलानुसार भाजपा नऊ सदस्य संख्या (गटनेता भरत हारपुडे), काँग्रेस सहा सदस्य संख्या (गटनेता आरोही तळेगावकर), शिवसेना दहा सदस्य संख्या (गटनेता शादान चौधरी), महालक्ष्मी शहर विकास पार्टी यांची सदस्य संख्या तीन (गटनेता सेजल परमार), आरपीआय गट सदस्य संख्या एक व अपक्ष गट सदस्य संख्या एक असे गट तयार करण्यात आले आहेत. यापैकी अपक्ष गटाचे राजू बच्चे यांनी स्वीकृत नगरसेवकसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला. आरपीआय गटाचे दिलीप दामोदरे यांनी मित्रपक्ष भाजपाला पाठिंबा दिला. भाजपाच्या वतीने जाधव व विनय विद्वांस ही नावे दिली होती. गटनेते हारपुडे यांनी पीठासन अधिकारी यांच्याकडे जाधव यांच्या नावाचे शिफारसपत्र दिले. काँग्रेसतर्फे कविश्वर यांच्या नावाची शिफारस गटनेत्या तळेगावकर यांनी केली होती. शिवसेनेच्या वतीने आगरवाल व सौम्या शेट्टी ही नावे देण्यात आली होती. गटनेत्या चौधरी यांनी आगरवाल यांच्या नावाचे शिफारस पत्र दिले. महालक्ष्मी गटाकडून बाबु येंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, त्यांची सदस्य संख्या तीनच असल्याने तो अर्ज बाद ठरविण्यात आला. निवडीनंतर स्वीकृत नगरसेवकांची मिरवणूक काढली होती. (वार्ताहर)  शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत गटनेत्या झालेल्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नगरसेविका शादान चौधरी यांनी नामनिर्देशित सदस्यांची निवड करताना निष्ठावंत शिवसैनिकांना डावलत माजी नगरसेवक आगरवाल यांच्या नावाचे शिफारस पत्र दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेने चौधरी यांना सर्व मतभेद बाजूला ठेवत पक्षात घेतले. मात्र गटनेते झाल्यावर त्यांनी शिवसैनिकांना ठेंगा दाखविला असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या पाठबळामुळेच निष्ठावानांवर अन्याय झाल्याचा संतप्त आरोप काही जणांनी केला.