शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांसाठीच आदर्शवत ठरला ‘ती’चा गणपती

By admin | Updated: September 10, 2014 06:17 IST

ढोल ताशाचा गजर... कृती-निर्मिती-संस्कृतीचा जागर... महिलांचा सन्मान अन् विविध सामाजिक संदेश देत सोमवारी ‘लोकमत सखी

पुणे : ढोल ताशाचा गजर... कृती-निर्मिती-संस्कृतीचा जागर... महिलांचा सन्मान अन् विविध सामाजिक संदेश देत सोमवारी ‘लोकमत सखी गणेश मंडळा’च्या ‘ती’च्या गणपतीला उत्साही, जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शाडूपासून तयार केलेल्या मूर्तीचे विसर्जन लोकमत कार्यालयातील कृत्रिम हौदात करून महिला मंडळाने एक आदर्शही घालून दिला. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आपले बाप्पा’ या उपक्रमांतर्गत या वर्षी ‘लोकमत महिला गणेश मंडळा’ची स्थापना केली. कार्यालयातील सर्व महिलांचा या मंडळात समावेश आहे. गणरायाचे स्वागत करण्यापासून ते त्याला निरोप देईपर्यंतचे सर्व नियोजन महिलांनीच केले. गणेशोत्सवातील पहिल्या दिवसापासून दोन्ही वेळची आरती महिल्यांच्या हस्ते करण्यात आली. बाप्पाला निरोप देतानाही महिलांनीच पुढाकार घेतला. सोमवारी सकाळी मंडळातील महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर लॉ कॉलेज रस्त्यावरील कार्यालयापासून खास तयार करण्यात आलेल्या रथात ‘ती’च्या गणपतीची मिरवणूक निघाली. मिरवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या रथावर स्त्री-शक्तीचा जागर करण्यात आला. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, या थोर महिलांसह विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांची छायाचित्रे रथावर झळकत होती. मंडळाच्या सर्व महिला डोक्यावर भगव्या रंगाचे फेटे घालून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मिरवणुकीचा डौल काही निराळाच होता. शिवगर्जना ढोल-ताशा पथकाच्या दमदार वादनाने मिरवणुकीच्या वैभवात आणखीच भर पडली. हातात लोकमतचे ध्वज, पर्यावरण रक्षण, कृती-निर्मिती-संस्कृतीचा जागर करणारे फलक मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. लोकमत कार्यालयापासून निघालेली ही मिरवणूक एसएनडीटी चौकातून प्रभात रस्त्यावर आली. महिलांकडून गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरूच होता. अत्यंत मंगलमयी वातावरणात मिरवणूक पुढे जात होती. ढोल-ताशा पथकाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. वाहतुकीला अडथळा न होऊ देता, गणेशोत्सवातील संस्कृती व मर्यादांचे भान ठेवून ‘ती’च्या गणपतीची मिरवणूक पुणेकरांना आकर्षित करीत होती. प्रभात रस्त्यावरून मिरवणूक पुढे राष्ट्रीय संग्रहालयाच्या चौकातून पुन्हा कार्यालयाकडे वळली. लॉ कॉलेज रस्त्याने पुन्हा लोकमत कार्यालयात आली. गणेशोत्सवात सुरुवातीपासून पर्यावरण रक्षणाचे आवाहन ‘लोकमत’र्फे करण्यात आले. तसेच विसर्जनही कृत्रिम हौदात करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)