शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी’तील तरुणांच्या हाती कुदळ अन् फावडे

By admin | Updated: June 28, 2017 23:25 IST

‘आयटी’तील तरुणांच्या हाती कुदळ अन् फावडे

अजय जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : लाखो रुपयांचे पॅकेज, शनिवार, रविवार सुट्टी... या सुटीत फुल्ल टू धमाल करायची... हा विचार ‘आयटी’तील तरुणाई करताना दिसतात. पण यालाही काहीजण अपवाद ठरतात. साताऱ्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात आलेल्या तरुणांनी ‘व्हायब्रण्ट एच आर भटकंती’ गु्रप स्थापन केला आहे. हे तरुण विकेंडला ग्रामीण भागात जाऊन सामाजिक कार्य करत आहेत. ‘जल है तो कल है,’ हा विचार तरुणाईच्या डोक्यात घोळू लागला आहे. हाच विचार आता तरुणाईला ‘विकेंड एन्जॉय’ करण्यासाठी वरदान देऊन जात आहे. ‘वॉटर कप’ स्पर्धेत उतरलेली तरुणाई जलसंधारणाची कामे करण्यासाठी एकवटली होती. कऱ्हाड तालुक्यातील वडोली-भिकेश्वर येथील शंकर साळुंखे या तरुणाने युवक, युवतींना एकत्र आणले. पुणे येथील स्थायिक झालेल्या युवक युवतींनी ‘व्हायब्रण्ट एच आर भटकंती’ हा ग्रुप निर्माण केला. त्यांच्यात समाजसेवेचा विचार पेरून पुणे येथील घोरावडेश्वरच्या डोंगरावर त्यांनी जलसंधारणाचे काम सुरू केले. गेल्यावर्षी घोरावडेश्वरच्या डोंगरावर या ग्रुपतर्फे शेकडो झाडे लावली. खालून कॅनच्या साह्याने पाणी नेऊन झाडे जगवली. भर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू लागली आणि घोरावडेश्वरच्या डोंगरावर पाणी उपलब्ध होण्यासाठी यंदा जलसंधारणाचे काम हाती घेतले. सुटीच्या दिवशी या युवक-युवतींनी घोरावडेश्वरच्या माथ्यावर तळ्यासारख्या भागाचे खोदकाम करून बांध उभारला. यामध्ये सुमारे दोन लाख लिटर पाणिसाठा अपेक्षित आहे. या पाण्याच्या फायदा खालील भागातील वनराईस व जलकुंड्यांना होणार आहे. काही महिन्यांपासून हे युवक सुटीच्या दिवशी सहकुटुंब डोंगरावर जातात. पाटी, खोरे घेऊन प्रत्येकजण कामाला सुरुवात करतो. बांध घालणे, चरी काढण्याचे काम करतात. त्याचवेळी काहीजण गाणे म्हणतात. विनोद सांगतात. हसत-खेळत, गप्पा मारत काम सुरूच राहते. हा ग्रुप निर्माण होण्यापूर्वी हे सर्वजण व्हायब्रण्ट एच. आर. या संघटनेत कार्यरत होते. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंखे हे आहेत. या संघटनेत साडेतीन हजारांहून अधिक सदस्य आहेत. या ग्रुपच्या स्थापनेत अ‍ॅड. श्रीनिवास इनामती, संभाजी काकड, अ‍ॅड. आदित्य जोशी, अ‍ॅड. विजय जगताप, विकास पनवेलकर, सुनील बागल आदींचा सहभाग आहे. दीड हजार विद्यार्थ्यांना मदत...‘व्हायब्रण्ट एच. आर. या संस्थेचे दोन वर्षांत तब्बल ३,८०० सभासद झाले आहेत. सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण या विषयावर विविध उपक्रम संस्था राबवत असते. संस्थेतर्फे सदस्यांना कामगार व औद्योगिक कायद्यांची माहिती देण्यासाठी १२० बैठका झाल्या. कामगार व औद्योगिक कायद्यांवर तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत २८ चर्चासत्रे घेतली आहेत. आठ शैक्षणिक संस्थांसोबत करार करून दीड हजार विद्यार्थ्यांना मदत केली आहे,’ अशी माहिती संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंखे यांनी यानिमित्ताने दिली.मोफत आरोग्य तपासणी...सामाजिक बांधिलकी जपत पुणे जिह्यातील साकुर्डी गाव दत्तक घेऊन सलग दोन वर्षे गावकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप शिबिरे घेण्यात आली. पाबळ येथील आश्रमास मोफत आवश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.