शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेटची वाहतूककोंडी सुटणे कठीणच

By admin | Updated: May 15, 2017 06:44 IST

स्वारगेट चौकातील वाहतूककोंडी आता सुटणार, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्वारगेट चौकातील वाहतूककोंडी आता सुटणार, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, ही कोंडी सुटण्याऐवजी भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, चौकामध्ये सुधारणा करताना पादचाऱ्यांबाबत नियोजनच करण्यात आलेले नाही. ज्या मार्गावरून एसटी आणि पीएमपी बस जाणार आहेत त्या रस्त्यांची रुंदी अतिशय कमी झाली आहे. बेकायदा वाहतूक करणारी वाहने, अतिक्रमणे आणि रस्त्यांवरून जाणारी वाहनांची संख्या पाहता भविष्यात या ठिकाणी वाहतुकीची समस्या उद्भवणार असल्याचे चित्र आहे. स्वारगेट चौकामध्ये एसटी बस स्थानक आणि पीएमपी बस स्थानक आहे. या ठिकाणी भविष्यात मेट्रो स्टेशनही होणार आहे. सध्या या चौकामधून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या जवळपास एक लाखाच्या आसपास आहे. स्वारगेट चौकाची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये सोलापूर रस्त्याकडून सारसबागेकडे जाणारा ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार असल्याचेही नियोजन होते. हा प्रस्ताव जेव्हा वाहतूक पोलिसांकडे परवानगीसाठी सादर करण्यात आला, तेव्हा तत्कालीन वाहतूक उपायुक्त विश्वास पांढरे यांनी काही मुद्दे उपस्थित करून पादचाऱ्यांबाबतचे नियोजन कसे करणार, याची विचारणा केली होती.सातारा रस्त्यावरून आलेल्या पुलाचे दोन पदर सारसबाग आणि हडपसरच्या दिशेने जातात, तर हडपसरकडून आलेली वाहतूक एसटी स्थानकासमोरील समांतर उड्डाणपुलावरून साईबाबा मंदिरापर्यंत नेऊन सोडण्यात आलेली आहे. पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यांचे मात्र नियोजन चुकल्याचे चित्र आहे. स्वारगेट चौकामध्ये सर्वात मुख्य समस्या ही पादचाऱ्यांची आहे. सध्याचे नियोजन पाहता भविष्यात या ठिकाणी अपघात वाढण्याची शक्यता आहे. एसटी, पीएमपी स्थानक, मेट्रो स्टेशनमुळे या भागात कमर्शियल कॉम्प्लेक्सही मोठ्या प्रमाणावर उभे राहणार आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केवळ एक सिग्नल बसवून उपाय सापडणार का, असा प्रश्न आहे. डेक्कन येथील गरवारे पुलाच्या धर्तीवर स्वारगेट येथील रस्त्याची उंची वाढवून पादचाऱ्यांसाठी भूमिगत रस्ता देण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी सुचवले होते. परंतु ग्रेड सेपरेटर होणार असल्याने असे करता येणार नसल्याचे एमएसआरडीसी आणि महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. त्या वेळी ग्रेड सेपरेटरच्या खालून भूमिगत पादचारी मार्ग तयार करण्याचा प्रस्तावही वाहतूक पोलिसांनी दिला होता.