शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या मुद्यावर मतदारांपुढे जाणार

By admin | Updated: February 15, 2017 02:36 IST

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात

पुणे : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे़ काँग्रेसने आजवर केलेली कामे आणि भाजप सरकार लोकांच्या डोळ्यात करीत असलेली धूळफेक हे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून विकासाच्या मुद्द्यावरच काँग्रेस मतदारांसमोर जाणार असल्याचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड़ अभय छाजेड यांनी सांगितले़ काँग्रेसने २१ कलमी वचननामा प्रसिद्ध केला असून तो जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ उमेदवारांचा हाऊस टू हाऊस प्रचार सुरू असून त्यातून १०० टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे़ काँग्रेसने केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहरासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपये व आघाडी सरकारकडून पाचशे कोटी रुपये आणले होते़ गेल्या अडीच वर्षात भाजपा सरकारने पुणे शहरासाठी एकही पैसा आणलेला नाही, हे पुणेकरांना जाणवून देणार आहोत़ काँग्रेसच्या ज्या योजनांना भाजपाने विरोधी पक्षात असताना विरोध केला होता़ त्या रोजगार हमी योजना, आधार कार्ड या योजनांचाच भाजपा आता प्रचारात वापरत असल्याचे लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न असेल़ काँग्रेसच्याच योजना भाजपा सरकारने नवीन पॅकेजिंग करून त्यात सादर केल्या आहेत़ आजही त्यांना महापालिकेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लागत आहे़ यावरून त्यांना आपल्या कामावर नाही तर केवळ पंतप्रधानांच्या नावावर मत मागत आहेत़ त्यांच्याकडे मत मागण्यासारखे भांडवल नसल्याचे यावरून दिसून येत आहे, हे मतदारांच्या मनात बिंबविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे़ उमेदवारांने त्याचे स्वत:चे फेसबुक पेज तयार केले आहे़ पदयात्रा, रोडशोमधून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे़ राज्य पातळीवरील अनेक नेते पुण्यात प्रचाराला येत असून काही जण रोडशोमध्ये सहभागी होणार आहेत़ पुढील काही दिवसांत अनेक नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून त्यातून काँग्रेसला अपेक्षित यश मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़